Share Market News: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला एका अशा 'गांधी स्टॉक'बद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना दीर्घ गुंतवणुकीवर बंपर रिटर्न्स दिले आहेत. या शेअरने 15 वर्षांत गुंतवणूकदारांना 1 हजार टक्क्यांहून अधिकचे रिटर्न्स दिले. एखाद्या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी, 3 ऑक्टोबर रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य आज 11 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
काय आहे कंपनीचे नाव
'गांधी स्पेशल ट्यूब लिमिटेड' असे या कंपनीचे नाव आहे. ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड कंपनी आहे. शेअर बाजारात गांधी नावाची दुसरी कंपनी नसल्यामुळे, या कंपनीच्या स्टॉकला गांधी स्टॉक म्हटले आहे. BSE आणि NSE मध्ये सूचीबद्ध असलेली ही कंपनी सीमलेस स्टील ट्यूब, वेल्डेड स्टील ट्यूब, कपलिंग नट आणि फ्युएल इंजेक्शन ट्यूब तयार करते. कंपनीचा स्टॉक फेब्रुवारी 2007 पासून स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहे. सुरुवातीपासूनच कंपनीचे गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
गेल्या 15 वर्षात विक्रमी परतावा
गांधी स्पेशल ट्यूब लिमिटेडच्या शेअर्सने 15 वर्षांत चांगला परतावा दिला आहे. 3 ऑक्टोबर 2008 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 59.70 रुपये होती. 29 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 683.40 रुपये झाली. याचा अर्थ गेल्या 15 वर्षांत कंपनीने गुंतवणूकदारांना 1044.72 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत कंपनीने 98.26 टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत कंपनीने गुंतवणूकदारांना 38.14 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
एक लाखाचे 11 लाख झाले
गेल्या 15 वर्षांत कंपनीने 1044 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांपूर्वी 59.70 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 1675 शेअर्स मिळाले असते. ज्याचे मूल्य आज 11.44 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. अशाप्रकारे, कंपनीने 15 वर्षांत गुंतवणूकदारांची 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढवून 11 लाख रुपयांपेक्षा जास्त केली आहे.