ऑन डोअर कॉन्सेप्ट्सच्या (On Door Concepts IPO) आयपीओची जबरदस्त सुरुवात झाली आहे. कंपनीचा IPO 2.88 टक्के प्रीमियमसह 214 रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीच्या आयपीओचा (IPO News) प्राईज बँड 208 रुपये होता. दरम्यान, कंपनी एनएसई एसएमईमध्ये (NSE SME) लिस्ट झाली आहे.
२३ ऑक्टोबरला आयपीओ ओपन
ऑन डोअर कॉन्सेप्टचा आयपीओ 23 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. 4 दिवसांच्या आयपीओ ओपनिंगदरम्यान या आयपीओला 12 पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन मिळालं. आयपीओ ओपनिंगच्या अखेरच्या दिवशी हा आयपीओ 5.59 पट सबस्क्राईब झाला. या दिवशी रिटेल सेक्शनमध्ये 7.87 पट सबस्क्राईब झाला.
ऑन डोअर कॉन्सेप्टच्या आयपीओची लॉट साईज 31.18 कोटी रुपये आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना 14.99 लाख फ्रेश शेअर्स जारी करण्यात आले. कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा आयपीओपूर्वी 51.92 टक्के होता. आता आयपीओनंतर तो कमी होऊन 38.14 टक्के झालाय.
बॅलन्स शीट किती मजबूत
ऑन डोअर कॉन्सेप्टचा महसूल गेल्या आर्थिक वर्षादरम्यान 18015.52 कोटी रुपये होता. कंपनीला यादरम्यान 1306.18 कोटी रुपयांचा (करानंतर) नफा झाला. यापूर्वी २ आर्थिक वर्षात कंपनीला तोटा झाला होता.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)