शेअर बाजारातील कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीजचा शेअर गेल्या 10 वर्षांत तब्बल 2767 टक्क्यांनी वधारला आहे. अर्थात, एखाद्या गुंतवणूकदारांने या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आतापर्यंत त्याचे 2.7 लाख रुपये झाले असते. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1517.05 रुपयांवर पोहोचला होता.
या वर्षात 12 टक्क्यांची तेजी -
या वर्षात या शेअरमध्ये 12 टक्क्यांहूनही अधिकची तेजी दिसून आली आहे. मात्र, गेल्या एक वर्षाचा विचार करता हा शेअर 84 टक्क्यांनी वधारला आहे. ही कंपनी टॅबलेट्स, ड्राय सिरप (बॉटल्स), सॉफ्ट जेल, लिक्विड सिरप आदींचे तयार करत. महत्वाचे म्हणजे, कंपनी जेनेरिक फॉर्म्युलेशन आणि ब्रँडेड प्रोडेक्ट डेव्हलप, प्रोड्यूस आणि त्यांचे मार्केटिंगही करते. ही कंपनी आपले उत्पादन परदेशातही एक्सपोर्ट करत.
कंपनीच्या शेअर होल्डिंगचा विचार करता, प्रमोटर्सकडे एकूण 70.62 टक्के वाटा आहे. कंपनीमध्ये 29.38 टक्के एवढी पब्लिक शेअर होल्डिंग आहे. तसेच या कंपनीत म्युच्युअल फंड्स आणि परदेशी गुंतवणूकदारांचाही वाटा आहे.
असा आहे कंपनीचा तिमाही निकाल -
गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा नफा (कर भरणा केल्यानंतर) रु 86.91 कोटी एवढा आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 70.77 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,617.80 एवढा आहे. तर नीचांक 801.15 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 11,531.14 कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)