Join us  

याला म्हणतात बम्पर परतावा! या शेअरनं घेतली 37000% हून अधिकची उसळी, 8 वर्षांत 1 लाखाचे झाले 3.7 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 8:20 PM

या शेअरने 8 वर्षांत 37000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्योती रेजिन्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1818.45 रुपये आहे...

स्पेशलिटी केमिकल इंडस्ट्रीची कंपनी असलेल्या ज्योती रेजिन्स अ‍ॅण्ड अ‍ॅडहेसिव्हजच्या शेअर्सने गेल्या केवळ 8 वर्षांतच बम्पर परतावा दिला आहे. गेल्या 8 वर्षांत कंपनीचा शेअर 4 रुपयांवरून थेट 1500 रुपयांवर पोहोचला आहे. ज्योती रेजिन्स अण्ड अ‍ॅडहेसिव्हजच्या (Jyoti Resins and Adhesives) शेअरने 8 वर्षांत 37000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ज्योती रेजिन्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1818.45 रुपये आहे.

1 लाखाचे झाले 3.78 कोटी रुपये -ज्योती रेजिन्स अ‍ॅण्ड अ‍ॅडहेसिव्हजचा शेअर 21 एप्रिल 2015 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 4.12 रुपयांवर होता. तो 21 एप्रिल 2023 रोजी बीएसईवर 1560.35 रुपयांवर पोहोचला आहे. ज्योती रेजिन्स अ‍ॅण्ड अ‍ॅडहेसिव्हने गेल्या 8 वर्षांत इनव्हेस्टर्सना 37700 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 21 एप्रिल 2015 रोजी ज्योती रेजिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणले असते आणि ते कायम ठेवले असते, तर आता त्याचे 3.78 कोटी रुपये झाले असते.

4 वर्षांत शेएर्समध्ये 3700% चा बम्पर परतावा -ज्योती रेजिन्स अ‍ॅण्ड अ‍ॅडहेसिव्हजच्या शेअर्सने गेल्या 4 वर्षांपेक्षाही कमी काळात आपल्या गुंतवणूकदारांना 3750 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 21 जून 2019 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 40.33 रुपयांच्या पातळीवर होता. तो 21 एप्रिल 2023 रोजी बीएसईवर 1560.35 रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 21 जून 2019 रोजी ज्योती रेजिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती तर, आता त्याचे 38.68 लाख रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक