Join us  

याला म्हणतात बम्पर परतावा; या मल्टीबॅगर शेअनं 6 हजारचे केले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 9:05 AM

एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज ते 1 लाख रुपये 1,71,900 टक्क्यांनी वाढून 17.19 कोटी रुपये झाले असते.

शेअर बाजारातगुंतवणूक करताना योग्य शेअरची निवड करणे अत्यंत आवश्यक असते. जर योग्य शेअर निवडला, तर आपल्याला बम्पर परतावा मिळू शकतो.  मात्र, आपण चुकीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर मोठे नुकसानही होऊ शकते. बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अधिक नफ्यासाठी शेअर बाजारात दीर्घ काळ गुंतवणूक करणे योग्य असते. अशाच एक शेअरने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरचे नाव आहे GRM ओव्हरसीज. या शेअरने आपल्या गुतंवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

शेअरनं घेतलीय 1,71,000 टक्क्यांची उसळी -गेल्या दोन दशकात, GRM ओव्हरसीजचे शेअर्स तब्बल 1,71,000 टक्क्यांनी वधारले आहेत. शुक्रवारी बीएसईवर जीआरएम ओव्हरसीजचा शेअर्स १७२ रुपयांवर बंद झाला. मात्र, साधारणपणे 20 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1 ऑक्टोबर 2004 रोजी, या स्टॉकने बीएसईवर जेव्हा व्यापाराला सुरूवात केली तेव्हा त्याच्या एका स्टॉकची किंमत 0.10 रुपये एवढी होती. अशा पद्धतीने गेल्या 20 वर्षात या शेअरची किंमत 1,71,900 टक्क्यांनी वाढली आहे.

एक लाखाचे झाले 17.19 कोटी -जर 20 वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज ते 1 लाख रुपये 1,71,900 टक्क्यांनी वाढून 17.19 कोटी रुपये झाले असते. याच पद्धतीने, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तेव्हा केवळ 6,000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे एक कोटी रुपये झाले असते. 

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षभरात जीआरएम ओव्हरसीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली असून गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 15 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. तसेच, गेल्या एका वर्षात हा स्टॉक 54.14 टक्क्यांनी घसरला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक