लार्सन अँड टुब्रोच्या (L&T) उत्पादन शाखेला चालू तिमाही दरम्यान देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीच्या वर्गीकरणानुसार, 2,500 कोटी रुपयांपासून ते 5,000 कोटी रुपयांपर्यंतचे क़न्ट्रॅक्ट मोठ्या ऑर्डरच्या श्रेणीत येतात. कंपनीने बीएसईला पाठवलेल्या सूचीत, हे प्रकल्प L&T कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युटर बिझनेसला देण्यात आल्याचे म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये, कंपनीला राज्याच्या पॉवर ट्रान्समिशन ग्रिडवरील भार कमी करण्यासाठी ट्रान्समिशन लाइन तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय सौदी अरेबिया, कुवेत आणि इतर देशांतही कंपनीला आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाल्या आहे.
अशी आहे कंपनीच्या शेअरची स्थिती -
कंपनीचा शेअर आज 2,925.40 रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षात YTD मध्ये हा शेअर 40.01% ने वधारला आहे. तर, गेल्या पाच वर्षांत या शेअर ने 115.39% चा परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 1358 रुपयांनी वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)