Join us

याला म्हणतात 'धाकड' शेअर...! 3 वर्षांत 500 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 3:52 PM

जर्मनी, नेदरलँड, डेनमार्क आणि भारतासह अनेक देशांमध्ये समूहाचे संयुक्त संशोधन आणि विकास केंद्र आहे. भारतात सुझलॉन अत्याधुनिक उत्पादन सुविधांसह 28 वर्षांहूनही अधिक काळापासून कार्यरत आहे.

 जेव्हा-जेव्हा मल्टीबॅगर स्टॉक्सची चर्चा होते, तेव्हा-तेव्हा सुझलॉन एनर्जीचेही (Suzlon Energy Share) नाव येतेच. सुझलॉन एनर्जीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत तब्बल 500 टक्क्यांपर्यंतचा जबरदस्त परतावा दिला आहे. सुझलॉन समूह हा रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्समधील एक मुख्य प्लेअर आहे. हा समूह जगभरातील एकूण 17 देशांमध्ये 20 गीगावॅटहून अधिकच्या पवन ऊर्जा निर्मिती क्षमतेचा दावा करतो. हा समूह सुझलॉन एनर्जी लिमिटेड आणि हिच्या सहाय्यक कंपन्यांपासून तयार झाला आहे. सुझलॉन ग्रुपचे मुख्यालय पुण्यात आहे.

जर्मनी, नेदरलँड, डेनमार्क आणि भारतासह अनेक देशांमध्ये समूहाचे संयुक्त संशोधन आणि विकास केंद्र आहे. भारतात सुझलॉन अत्याधुनिक उत्पादन सुविधांसह 28 वर्षांहूनही अधिक काळापासून कार्यरत आहे.

सुझलॉन एनर्जी लिमिटेड नुकतेच आपले Q1FY24 परिणामांची घोषणा केली. यानुसार, कंपनीच्या विक्रीत Q1FY23 च्या तुलनेत 2 टक्के एवढी घसरण झाली आहे. जी 1,351 कोटी रुपये राहिली. तर कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात 7 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ही 199 कोटी रुपये राहिली. याच प्रकारे, कंपनीचा शुद्ध नफा 101 कोटी रुपये राहिला. तर आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत हा नफा 2,433 कोटी रुपये एवढा होता.

सुझलॉन एनर्जीच्या शेअरने गेल्या एका वर्षात 166 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. तसेच, कंपनीने गेल्या 3 वर्षांत तब्बल 519 टक्क्यांचा परतावा दिला आहे. याशिवाय, कंपनीचा 20.6% चा आरओसीई आहे. कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारीही 5% टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. यामुळे हा शेअर 21.93 रुपयांवर पोहोचला होता. याशिवाय, शेअरच्या व्हॉल्यूममध्ये 1.43 पटीपेक्षाही अधिकची वृद्धी झाली.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार