Join us

याला म्हणतात धमाका! ₹45 चा शेअर पहिल्याच दिवशी पोहोचला ₹80 वर, दिला 75% हून अधिकचा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 4:20 PM

शेअर बाजारात अरविंद अँड कंपनीच्या (Arvind and Company) शेअरची धमाकेदार एंट्री

शेअर बाजारात अरविंद अँड कंपनीच्या (Arvind and Company) शेअरची धमाकेदार एंट्री झाली आहे. या कंपनीचा शेअर एक्सचेन्जमध्ये 80 रुपयांवर लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये हा शेअर 45 रुपयांना मिळाला होता. कंपनीचा शेअर जवळपास 78 टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्ट झाला आहे. अरविंद अँड कंपनीच्या आयपीओमध्ये डाव लावणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर तब्बल 35 रुपयांचा फायदा झाला आहे. कंपनीचा शेअर एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट झाला आहे.

385 पट सबस्क्राइब -अरविंद अँड कंपनी शिपिंग एजन्सीज (Arvind and Company IPO) चा आयपीओ एकूण 385.03 पट सब्सक्राइब झाला आहे. कंपनीच्या आयपीओचा रिटेल कोटा 321.97 पट सब्सक्राइब झाला आहे. तसेच आयपीओच्या दुसऱ्या कॅटेगिरीमध्ये 436.05 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये प्रमोटर्सचा वाटा 100 टक्के होता. जो आता 73 टक्के राहिला आहे. कंपनी, आयपीओच्या माध्यमाने उभारलेल्या फंडाचा वापर कॅपिटल एक्सपेंडिचरच्या फंडिन आणि जनरल कॉर्पोरेट पर्पजसाठी करेल.

3000 शेअर खरेदी करू शकत होते रिटेल इन्व्हेस्टर -अरविंद अँड कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 12 ऑक्टोबर 2023 रोजी  खुला झाला होता आणि 16 ऑक्टोबरपर्यंत खुला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअर्सचे अॅलॉटमेंट 19 ऑक्टोबरला फाइनल झाले होते. अरविंद अँड कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्स 1 लॉटसाठी डाव लावू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये 3000 शेअर होते. अर्थात, रिटेल इन्व्हेस्टर्सना आयपीओमध्ये 135000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागली आहे. कंपनीच्या पब्लिक इश्यूची एकूण साइज 14.74 कोटी रुपये एवढी आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक