शेअर बाजारातील एक पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर आहे पॉलिएस्टर मॅन्युफॅक्चरिंग फर्म शेखावती पॉली-यार्न लि.(Shekhawati Poly-Yarn Ltd)चा. या शेअरने गेल्या केवळ एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 310% चा परतावा दिला आहे.
गेल्या वर्षी 10 एप्रिलला हा शेअर ₹ 0.60 वर होता. तो आज ₹ 2.63 वर आला आहे. तसेच, गेल्या 4 वर्षांत, म्हणजेच मार्च 2020 पासून या शेअरने अनेक पटींनी परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर ₹ 0.2 वरून आताच्या किमतीपर्यंत वधारला आहे. अर्थात या शेअरने 1215 टक्क्याचा परतावा दिला आहे.
अशी आहे शेअरची स्थिती -
2024 YTD मध्ये हा शेअर 44 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. गेल्या 4 महिन्यांपैकी 2 मध्ये पॉझिटिव्ह परतावा देत आहे. मार्च महिन्यात 4.4 टक्के आणि फेब्रुवारी महिन्यात 13.5 टक्क्यांच्या घसरणीनंतर एप्रिल महिन्यात आतापर्यंत या शेअरमध्ये 14 टक्क्यांची तेजी आली आहे. दरम्यान, या वर्षाच्या जानेवारी महिन्यात या शेअरमध्ये 53 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आज, 8 एप्रिल 2024 रोजी इंट्रा-डे व्यवहारात हा शेअर आपला 52-आठवड्यांचा उच्चांक ₹2.63 वर पोहोचला आहे. हा शेअर आता 7 सप्टेंबर, 2023 रोजीची आपली 52- आठवड्याची निचांकी पातळी ₹0.46 च्या तुलनेत जवळपास 472 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनी संदर्भात बोलायचे झाल्यास, शेखावाती पॉली-यार्न लिमिटेड भारतात पॉलिस्टर टेक्स्चराइज्ड, ट्विस्टेड यार्न आणि विणलेल्या कापडांचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनीची स्थापना 1990 मध्ये झाली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)