Join us  

Multibagger Return : याला म्हणतात छप्परफाड रिटर्न, १५ दिवसांत १ लाखाचे झाले २६५००० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 4:31 PM

2023 च्या पहिल्या पंधरा दिवसांत काही शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे.

2023 च्या पहिल्या पंधरा दिवसांत काही शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. यामध्ये नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजी 165.12 टक्के, 3पी लँड होल्डिंग्ज 116.99 टक्के आणि कूल कॅप्स इंडस्ट्रीजने 104 टक्के रिटर्न दिला आहे. 

सर्वप्रथम, कूल कॅप्स इंडस्ट्रीजची शेअर प्राईज हिस्ट्री पाहू. शुक्रवारी हा शेअर 6.38 टक्क्यांनी वाढून 501.05 रुपयांवर बंद झाला होता. आठवड्यापूर्वी हा शेअर फक्त 375.35 रुपयांवर होता. या कालावधीत शेअरने 33.49 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, एका महिन्यात 108.95 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या 3 महिन्यांत या शेअरने 188 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 478.80 रुपये आणि नीचांकी स्तर 41.50 रुपये आहे.

नवीन वर्षात 3P लँड होल्डिंगनंदेखील आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकने एका आठवड्यात 32 टक्के आणि एका महिन्यात 91 टक्के परतावा दिला आहे, परंतु गेल्या 15 दिवसांत तो जवळपास 117 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी स्तर 36.65 रुपये आणि नीचांकी स्तर 13 रुपये आहे.

असे झाले 1 लाखांचे 265000 रुपयेजर आपण नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीबद्दल बोललो तर, या स्टॉकने एका महिन्यात सुमारे 170 टक्क्यांनी झेप झाली आहे. गेल्या 3 महिन्यांत यात 173 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एका वर्षात या शेअरने 378.68 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. या वर्षी केवळ 15 दिवसांत या स्टॉकने 165 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच 15 दिवसांपूर्वी या शेअरमध्ये जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याच्या एक लाखांचे मूल्य आता 265000 पेक्षा जास्त झाले असते.

(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा