Lokmat Money >शेअर बाजार > याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव

याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव

हा शेअर या वर्षी YTD मध्ये 89.79 टक्क्यांनी वधाला आहे. महत्वाचे म्हणजे, वर्षभरात आरव्हीएनएलचा शेअर तब्बल 294.24 टक्क्यांनी वधारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 05:04 PM2023-05-03T17:04:39+5:302023-05-03T17:05:20+5:30

हा शेअर या वर्षी YTD मध्ये 89.79 टक्क्यांनी वधाला आहे. महत्वाचे म्हणजे, वर्षभरात आरव्हीएनएलचा शेअर तब्बल 294.24 टक्क्यांनी वधारला आहे.

This is called return government company rvnl share has become a rocket, it is doing well every day, the price has reached ₹130 | याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव

याला म्हणतात परतावा! या सरकारी कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, रोजच करतोय मालामाल, ₹130 वर पोहोचला भाव

रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या ​​शेअर्सनी (RVNL) सध्या रॉकेट स्पीड घेतला आहे. बुधवारच्या व्यवहाराच्या दिवसात RVNL चा शेअर 52 आठवज्यांतील हाई ₹130 पर पहोचला आहे. हा स्टॉक मंगळवारी बीएसईवर बंद भाव ₹118.40 वरून 3.8 टक्क्यांनी वाढून ₹123 टक्क्यांवर खुला झाला होता. दिवसभराच्या व्यवहाराच्या दिवसात हा शेअर जवळपास 10 टक्क्यांनी वधारला. 

RVNL च्या शेअरने गेल्या तीन व्यवहाराच्या सत्रांत तब्बल 26 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 72.66 टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर या वर्षी YTD मध्ये 89.79 टक्क्यांनी वधाला आहे. महत्वाचे म्हणजे, वर्षभरात आरव्हीएनएलचा शेअर तब्बल 294.24 टक्क्यांनी वधारला आहे.

शेअर्समध्ये तेजी -
RVNLच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची अनेक कारणे आहेत. रेल्वे फर्मला अनेक ऑर्डर्स आणि 'नवरत्न'चा दर्जा मिळाल्यानंतर शेअर्सनी मोठी उसळी घेतली आहे. कंपनीला एकापाठोपाठ एक अनेक मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

RVNL ने एका एक्सचेन्ज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बजाज सागर प्रकल्प, बांसवाडा (राजस्थान) ऑन इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कंस्ट्रक्शन (EPC) सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी टर्नकी आधार, ज्यात 10 वर्षांच्या O&M सामील आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2,249 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे (आरवीएनएलचा वाटा 51% आहे आणि आणि एससीसीचा वाटा 49% आहे).

कंपनीने चेन्नई मेट्रो रेल्वेच्या (सीएमआरएल) फेज-II प्रकल्पाच्या तीन भूमिगत पॅकेजेससाठी एकूण 3,146 कोटी रुपयांचे कंत्राटही मिळवले आहे. या शिवाय बीएसईसोबत कॉर्पोरेट फायलिंगमध्ये, सार्वजनिक उपक्रम विभागाने RVNL ला 'नवरत्न' दर्जाही दिला आहे. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, या शेअरची सरासरी टारगेट प्राइस 86 रुपये आहे.

Web Title: This is called return government company rvnl share has become a rocket, it is doing well every day, the price has reached ₹130

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.