Lokmat Money >शेअर बाजार > याला म्हणतात परतावा! 'या' आयटी कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले 36 लाख, तीन वेळा दिला बोनस शेअर

याला म्हणतात परतावा! 'या' आयटी कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले 36 लाख, तीन वेळा दिला बोनस शेअर

मार्च 2009 मध्ये, विप्रोच्या एका शेअरची किंमत जवळपास 50 रुपये एवढी होती. तर आज विप्रोच्या शेअरची किंमत 412.35 रुपये एवढी आहे. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न शेअरचा परतावा, किंमत वाढीपेक्षा फार अधिक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:41 PM2022-12-04T17:41:36+5:302022-12-04T17:42:32+5:30

मार्च 2009 मध्ये, विप्रोच्या एका शेअरची किंमत जवळपास 50 रुपये एवढी होती. तर आज विप्रोच्या शेअरची किंमत 412.35 रुपये एवढी आहे. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न शेअरचा परतावा, किंमत वाढीपेक्षा फार अधिक आहे.

This is called return IT company Wipro Share made one lakh to 36 lakhs, got bonus share three times in 14 years | याला म्हणतात परतावा! 'या' आयटी कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले 36 लाख, तीन वेळा दिला बोनस शेअर

याला म्हणतात परतावा! 'या' आयटी कंपनीच्या शेअरनं एक लाखाचे केले 36 लाख, तीन वेळा दिला बोनस शेअर

शेअर बाजारातीलगुंतवणूकदार केवळ शेअरच्या वाढलेल्या किंमतीतूनच कमाई करत नाहीत, तर इतरही काही गोष्ठी आहेत, ज्या शेअरची व्हॅल्यू वाढविण्याचे काम करतात. यात डिव्हिडेन्ड पेमेन्ट, शेअर बायबॅक, बोनस शेअर, आदी काही घोषणांचाही समावेश आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलियोतील कंपन्यांकडून याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. 

असाच एक स्टॉक म्हणजे, विप्रोचे शेअर. आयटी क्षेत्रातील या  शेअरने गेल्या 14 वर्षांत आपल्या दिर्घकालीन गुंतवणूकदारांना तीनवेळा बोनस शेअर दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 14 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, तर आता त्याचे 36 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाले असतील.

मार्च 2009 मध्ये, विप्रोच्या एका शेअरची किंमत जवळपास 50 रुपये एवढी होती. तर आज विप्रोच्या शेअरची किंमत 412.35 रुपये एवढी आहे. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न शेअरचा परतावा, किंमत वाढीपेक्षा फार अधिक आहे. गेल्या 14 वर्षांत, विप्रो लिमिटेडने जून 2010, जून 2017 आणि मार्च 2019 मध्ये बोनस शेअरची घोषणा केली. जून 2010 मध्ये विप्रो लिमिटेडने 2:3 या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली होती. जून 2017 मध्ये आयटी कंपनीने 1:1 बोनस शेअरची घोषणा केली होती. तर मार्च 2019 मध्ये 1:3 या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा करण्यात आली होती. 

एक लाखाचे झाले 36 लाख रुपये -
जसे, की विप्रोच्या शेअरची किंमत आज 412.35 रुपये प्रती शेअर आहे. आयटी कंपनीने घोषित केलेल्या तीन बोनस शेअर्सनंतर गेल्या 14 वर्षांत 1 लाख रुपयांचे आज 36.63 लाख रुपये (₹412.35 x 8,885) झाले असतील. सध्या विप्रो ही देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2,26,224.51 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 3 जनवरीला 726.70 रुपये एवढी होती. तर 17 ऑक्टोबरला कंपनीची एका वर्षातील लो लेव्हल 372.40 रुपये एवढी होती.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: This is called return IT company Wipro Share made one lakh to 36 lakhs, got bonus share three times in 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.