लॉयड्स इंजिनिअरिंगच्या (Lloyds Engineering Works) शेअर प्राइसमध्ये या वर्षात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर केवळ 15.44 रुपयांवर होता. हा शेअर सध्या 45.77 रुपयांवर आहे.
काय म्हणतायत एक्सपर्ट? -
ब्रोकरेज फर्म Ventura Securities च्या रिपोर्टनुसार, आगामी काळात हा शेअर 71 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात सध्याच्या किंमतीचा विचार करता, हा शेअर 55 टक्क्यांपर्यंत वधारू शकतो. ब्रोकरेज फर्मने या शेअरला ‘बाय’ टॅग दिला आहे. लॉयडकडे 921 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार, कंपनीचा एकूण महसूल 996 कोटी रुपये होता. याशिवाय प्रॉफिट 168 कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो. कंपनीच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.
6 महिन्यांत पैसा डबल -
शेअर बाजारात गेल्या 6 महिन्यांत लॉयड्सच्या शेअर्समध्ये जवळपास 100 टक्यांपर्यंतची तेजी दिसून आली आहे. मात्र, गेला एक महिना गुंतवणूकदारांच्या दृष्टीने तेवढा चांगला गेला नाही. या कालावधीत हा स्टॉक 1.64 टक्क्यांची तेजी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 57.53 रुपये प्रति शेअर तर 52 आठवड्यांचा निचांक 12.50 रुपये प्रति शेअर आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)