शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत. ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मल्टीबॅगर परतावा देत मालामाल केले आहे. असाच एक शेअर म्हणजे, दारू बनवणाऱ्या पिकॅडिली अॅग्रो लिमिटेड (Piccadily Agro Inds Limited) कंपनीचा आहे. केवळ 25 रुपयांच्या या शेअरने रॉकेट स्पीड घेत आपल्या गुंतवमूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरने 1997 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 112,700.00% पर्यंतचा परतावा दिला आहे.
या कंपनीच्या व्हिस्की इंद्रीने याच ऑक्टोबर महिन्यात 2023 व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवार्ड्समध्ये 'बेस्ट इन शो, डबल गोल्ड'चा खिताब जिंकला आहे. या भारतीय ब्रँडला बाजारात मोठी मागणी आहे. 1997 मध्ये 25 पैशांवर असलेला हा शेअर 65,100 टक्क्यांचा परतावा देत 165 रुपयांवर पोहोचला. अर्थात, ज्या गुंतवणूकदारांनी 11 जुलै 1997 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुतंवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असेल, त्याचे ऑक्टोबर 2023 च्या सुरुवातीपर्यंत 65 कोटी रुपये झाले असतील. गेल्या 3 ऑक्टोबरला शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली होती.
एक महिन्यात किती दिला परतावा -
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत कंपनीच्या शेअरने दिलेला परतावा आणखी वाढला आहे. Piccadily Agro Inds चा शेअर आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी 282 रुपयांवर बंद झाला होता. 11 जुलै 1997 पासून 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत या कंपनीने तब्बल 112,700% एवढा परतावा दिला आहे. अर्थात, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने मालामाल केले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)