शेअरबाजारातील जे गुंतवणूकदार डिव्हिडेंडमधून कमाई करण्याची संधी शोधत असतात, अशा गुंतवणूकदारांसाठी एक जबरदस्त संधी आहे. मल्टीबॅगर शेअर यमुना सिंडिकेटच्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 400 रुपयांचा जबरदस्त डिव्हिडेंड मिळत आहे. मात्र याचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आज शेवटची संधी आहे.
यमुना सिंडिकेट लिमिटेडचा शेअर आज 23 ऑगस्टला एक्स-डिव्हिडेंड ट्रेड करत आहे. अर्थात या शेअरची एक्स-डिव्हिडेंड डेट 23 ऑगस्ट आहे. डिव्हिडेंडच्या दृष्टीने एक्स-डिव्हिडेंड डेट ही अत्यंत महत्वाची असते. ज्या गुंतवणूकदारांचे नाव एक्स-डिव्हिडेंड डेटपर्यंत कंपनीच्या खात्यात शेअरहोल्डरच्या रुपात नोंदवले जाते, केवळ त्यांनाच डिव्हिडेंडचा फायदा मिळतो. यामुळे, जर आपल्यालाही प्रत्येक शेअरवर 400 रुपयांच्या डिव्हिडेंडच्या शेअरचा लाभ हवा असेल तर, त्यासाठी आज शेवटची संधी आहे.
किती आहे शेअरची किंमत -यमुना सिंडिकेट ही इंजिनिअरिंग सेक्टरशी संबंधित कंपनी आहे. खरे तर या कंपनीचा शेअर अत्यंत महागडा आहे. हा एक शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला आता 56 हजार रुपयांपेक्षाही अधिक खर्च लागेल. हा शेअर दुपारच्या व्यवहारावेळी 0.40 टक्क्यांच्या तेजीसह 56,000.75 रुपयांवर ट्रेड करत होता. आजच्या व्यवहारादरम्यान हा शेअर एक वेळा 58 हजार रुपयांच्याही पार गेला होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)