Join us  

याला म्हणतात नशिबाची साथ; रॉकेट बनलेल्या या पेनी स्टॉकनं 6 महिन्यांत केले 1 लाखाचे 15 लाख, बोनसही दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 7:02 PM

कंपनीने गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणावर बोनस शेअर्सदेखील दिले आहेत.

एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 6 महिन्यांत तुफान परतावा दिला आहे. या शेअरमध्ये करण्यात आलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक या काळात 15 लाख रुपयांवर पोहोचली आहे. या कंपनीचे नाव आहे, ग्लोब कमर्शियल लिमिटेड. ही कंपनी अॅग्रीकल्चर कमोडिटीज आणि ई-कॉमर्स सोल्युशन्स क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या 6 महिन्यांत ग्लोब कमर्शियलचे शेअर्स 5 रुपयांवरून 39 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीने गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणावर बोनस शेअर्सदेखील दिले आहेत.

1 लाखाचे झाले 15 लाख रुपये - बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर 7 ऑक्टोबर 2022 रोजी ग्लोब कमर्शियलचा शेअर 5 रुपयांवर होता. जर त्यावेळी एखाद्याने कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतणूक केली असती, तर त्याला ग्लोब कमर्शियलचे 20,000 शेअर्स मिळाले असते. ग्लोब कमर्शियलने जानेवारी 2023 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. हे बोनस शेअर्स मिळाल्यानंतर या शेअर्सची संख्या 40,000 वर पोहोचली असती. बीएसईवर 12 एप्रिल 2023 रोजी ग्लोब कमर्शियलचा शेअर रु.39.01 वर बंद झाला आहे. अशप्रकारे, 1 लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची एकूण किंमत आता 15.60 लाख रुपये झाली असती.

एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 400% ची उसळी -गेल्या एका वर्षात ग्लोब कमर्शिअल्सचा शेअर 407% ने वधारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)वर 13 एप्रिल 2022 रोजी कंपनीचा शेअर 7.68 रुपयांवर होते. तो 12 एप्रिल 2023 रोजी 39.01 रुपयांवर बंद झाला. ग्लोब कमर्शियल्सच्या शेयरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 52.60 रुपये एवढा आहे. तर निचांक 4.54 रुपये एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 23.5 कोटी रुपये एवढे आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक