Join us

'हा' आहे योग्य शेअर निवडण्याचा अचूक फंडा! असे वाढतात शेअरचे भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 2:51 PM

घेतलेले शेअर्स योग्य आहेत हे कसे पडताळून पाहाल? जाणून घ्या...

पोर्टफोलिओमध्ये जे शेअर्स आहेत त्यांचा बाजारभाव वाढला की त्याचा आनंद सर्वांनाच होत असतो. कारण, त्यामुळे मालमत्ता वाढत असते. परंतु जर भाव खाली येत असेल तर चिंतेचा विषय असतो. मग मनाशी वाटत राहते की मी निवडलेला शेअर योग्य की अयोग्य?

असे वाढतात शेअरचे भाव -- बाजारात सर्वसाधारण तेजी असणे.- ज्या इंडेक्समधील शेअर आहे त्या इंडेक्स फंडमध्ये तेजी असणे.- कंपनीचा तिमाही/वार्षिक निकाल उत्तम असणे आणि त्यास बाजाराने सकारात्मक घेणे. - कंपनीबद्दल एखादी सकारात्मक बातमी बाजाराने ऐकणे. - कंपनीतर्फे बोनस अथवा शेअर स्प्लिट होण्याची शक्यता.- कंपनी व्यवसायाची निगडित मोठी ऑर्डर मिळणे, व्यवसाय विस्तारीकरण होणे.- कंपनी मर्जर, अमलगमेशन, टेकओव्हर संदर्भात सकारात्मक पाऊल.

असे कमी होतात शेअरचे भाववरीलप्रमाणे नेमके विरुद्ध घडले तर अशी कारणे शेअरचा भाव खाली येण्यासाठी पूरक ठरतात. परंतु त्याव्यतिरिक खालील २ प्रमुख कारणे...- वाढीव भावात नफा वसुली होणे.- शेअरमधील स्पेक्युलेशन (सट्टा) चा प्रभाव. 

शेअरचे भाव वर-खाली होणे हे स्वाभाविक असते. यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचे मन कधीही विचलित करू नये. याउलट उत्तम कंपन्यांचे शेअर्स खालच्या भावात खरेदी करण्यासही संधी सोडू नये.

घेतलेले शेअर्स योग्य आहेत हे कसे पडताळून पाहाल? -जर खालील प्रश्नांची उत्तरे ‘हो’असतील तर आपण खरेदी केलेले शेअर्स योग्य आहेत असे समजावे.- कंपनीची उलाढाल प्रत्येक वर्षी वाढत आहे.- कंपनीचा करपूर्व व करपश्चात नफा प्रत्येक वर्षी वाढत आहे.- कंपनीचे प्रॉफिट मार्जिन स्थिर अथवा वाढत आहे.- कंपनीच्या व्यवसायास भविष्यात उत्तम दिवस आहेत.- कंपनी प्रमोटर्सने त्यांचा शेअरचा हिस्सा गहाण ठेवले नाहीत.- कंपनीवर कोणतेही मोठे कर्ज नाही. असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे.- देशी आणि विदेशी, तसेच म्युच्युअल फंड्सने कंपनीचे शेअर्स मागील दोन / तीन तिमाहीत अतिरिक्त प्रमाणात विक्री केले नाहीत.- एकूणच कंपनीचाही बॅलन्सशीट उत्तम असणे.

कसे पडताळाल? -- यासाठी कंपनी फंडामेंटल्स या टूलचा वापर करा.- आपल्या डिमॅट अकाउंटवर जा.- पोर्टफोलिओमधील शेअर ओपन करा- त्या शेअर मध्ये फंडामेंटल या टूलवर जाऊन वर नमूद केलेल्या गोष्टी  सहज पाहू शकता.- किंवा शेअर बाजाराशी निगडित अधिकृत वेब साईट्सवरही समभाग सर्च करून  ही माहिती सहज मिळविता येते.

आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध क्षेत्रांतील शेअर्स निवडून विकत घ्या की जे फंडामेंटली उत्तम असतील. दीर्घ काळ ठेवा आणि आपली संपत्ती अनेक पटींनी वाढवा. यातच खरी बाजार नीती दडली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक