कोटक महिंद्रा या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षांत 25000% पेक्षाही अधिक परतावा दिला आहे. या काळात खासगी बँकांचे शेअर्स 7 रुपयांवरून 1800 रुपयांपर्यंत वधारले आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील उच्च पातळी 1997 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1630 रुपये एवढी आहे.
1 लाखाचे झाले 2.5 कोटी - कोटक महिंद्रा बँकेचा शेअर 11 एप्रिल 2003 रोजी 7.19 रुपयांवर होता. तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)वर 11 एप्रिल 2023 रोजी 1847.60 रुपयांवर बंद झाला. काळात कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरने तब्बल 25600% एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 11 एप्रिल 2003 रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत काय ठेवली असती, तर आता त्याचे 2.55 कोटी रुपये झाले असते.
सुरुवातीपासून आतापर्यंत 34000% परतावा - कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरने सुरुवातीपासून आतापर्यंत 34435% एवढा परतावा दिला आहे. 22 मार्च 1996 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) कंपनीचा शेअर्स 5.35 रुपयांवर होता. तो 11 एप्रिल 2023 रोजी BSE वर 1847.60 रुपयांवर बंद झाला.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सुरुवातीलाच 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्याचे 3.45 कोटी रुपये झाले असते. यात आम्ही कोटक महिंद्रा बँकेने जारी केलेल्या बोनस शेअर्सचा समावेश केलेला नाही.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)