Lokmat Money >शेअर बाजार > ₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही काळापासून चांगला परतावा देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:38 PM2024-04-26T15:38:01+5:302024-04-26T15:38:14+5:30

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही काळापासून चांगला परतावा देत आहे.

This multibagger bank share to go to ₹35, gave more than 300% return in 2 years... | ₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

Bank Stocks to BUY : केरळमधील खासगी क्षेत्रातील स्मॉल कॅप साउथ इंडियन बँकेने (South Indian Bank) गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. व्यवसायात वेळोवेळी केलेल्या सुधारणांमुळे बँकेच्या 948 शाखा आणि 1315 एटीएमचे जाळे पसरले आहे. दरम्यान, सध्या बँकेचा शेअर 30 रुपयांच्या पातळीवर  (South Indian Bank Share Price) व्यवहार करत आहे. या शेअरने गेल्या 2 वर्षात 300 टक्के परतावा दिला आहे. यामुळेच आयसीआयसीआय डायरेक्टने पुढील 12 महिन्यांसाठी हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. 

आयसीआयसीआय डायरेक्टने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, बँकेचे लक्ष आता एमएसएमई आणि रिटेल पोर्टफोलिओवर आहे, यामुळे मार्जिन सुधारेल. FY24-26 दरम्यान सरासरी कर्ज वाढ 13% अपेक्षित आहे. या कालावधीत व्याज मार्जिन 3.2-3.3% च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. राईट इश्यूच्या माध्यमातून 1151 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. यामुळे बॅलेंसशीट मजबूत होईल.

शेअरचा इतिहास
2 फेब्रुवारी रोजी साऊथ इंडियन बँकेच्या शेअर्सने 40 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. पण, मार्च महिन्यात 25 रुपयांच्या पातळीवर घसरला. 19 एप्रिल रोजी हा 27 रुपयांवर आला. तिथून जोरदार वाढ झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा चांगला परतावा देऊ शकतो. या शेअरने यावर्षी आतापर्यंत 23 टक्के, सहा महिन्यांत 40 टक्के, एका वर्षात 110 टक्के आणि दोन वर्षांत 305 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

(टीप: या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही आमची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञाचा सल्ला घ्या.)
 

Web Title: This multibagger bank share to go to ₹35, gave more than 300% return in 2 years...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.