Lokmat Money >शेअर बाजार > रेखा झुनझुनवाला यांचा 'हा' स्टॉक 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, वाचा सविस्तर

रेखा झुनझुनवाला यांचा 'हा' स्टॉक 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, वाचा सविस्तर

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना, विचार करुन गुंतवणूक करायची असते. प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारात योग्य कंपनीच्या शोधात असतो.सध्या मार्केटमध्ये एका स्टॉकची जोरदार चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:28 PM2022-12-17T17:28:21+5:302022-12-17T17:29:09+5:30

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना, विचार करुन गुंतवणूक करायची असते. प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारात योग्य कंपनीच्या शोधात असतो.सध्या मार्केटमध्ये एका स्टॉकची जोरदार चर्चा सुरू आहे.

this rekh jhunjhunwala stock may cross 1500 rupees mark expert say buy it | रेखा झुनझुनवाला यांचा 'हा' स्टॉक 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, वाचा सविस्तर

रेखा झुनझुनवाला यांचा 'हा' स्टॉक 1500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, वाचा सविस्तर

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना, विचार करुन गुंतवणूक करायची असते. प्रत्येक गुंतवणूकदार शेअर बाजारात योग्य कंपनीच्या शोधात असतो.सध्या मार्केटमध्ये एका स्टॉकची जोरदार चर्चा सुरू आहे. हा स्टॉक भविष्यात मोठी उसळी घेऊ शकतो. रेखा झुनझुनवाला यांनीही या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत. 

37,085.63 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेली टाटा ग्रुप कंपनी टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचे ​​शेअर्स येत्या काही दिवसांत वाढू शकतात. ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीज हा टाटा समुहाचा शेअर 1310-1332 रुपयांच्या श्रेणीत विकत घेण्याचा विचार करत आहे. 

Women Investment Pattern: गुंतवणुकीसाठी महिला पतीकडून घेतात टिप्स, पण त्यांच्या मनातले कोण ओळखणार? जाणून घ्या...

गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. भविष्यातही ही गती कायम राहील अशी आशा आहे. कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 1535 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीचे 45,75,687 शेअर्स होते. कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी 1.61 टक्के आहे. शुक्रवारी टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 1.14 टक्क्यांनी घसरून 1,297.80 रुपयांवर आली. या वर्षी टाटा समूहाचा हा शेअर 10.21 टक्क्यांनी घसरला आहे.

Web Title: this rekh jhunjhunwala stock may cross 1500 rupees mark expert say buy it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.