Lokmat Money >शेअर बाजार > ₹२६२ वरुन ₹११ वर आला 'हा' शेअर, आता लागतंय अपर सर्किट; दिग्गज समूह खरेदी करणार कंपनी 

₹२६२ वरुन ₹११ वर आला 'हा' शेअर, आता लागतंय अपर सर्किट; दिग्गज समूह खरेदी करणार कंपनी 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीची विक्री प्रक्रिया सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 02:22 PM2023-11-08T14:22:28+5:302023-11-08T14:23:30+5:30

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीची विक्री प्रक्रिया सुरू आहे.

This share fell from rs 262 to 11 now upper circuit The company to buy the giant group reliance capital | ₹२६२ वरुन ₹११ वर आला 'हा' शेअर, आता लागतंय अपर सर्किट; दिग्गज समूह खरेदी करणार कंपनी 

₹२६२ वरुन ₹११ वर आला 'हा' शेअर, आता लागतंय अपर सर्किट; दिग्गज समूह खरेदी करणार कंपनी 

Reliance Capital share: अनिल अंबानींची दिवाळखोरीतील कंपनी रिलायन्स कॅपिटलची विक्री प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रिलायन्स कॅपिटलला कर्ज देणाऱ्यांना आशा आहे की हिंदुजा समूह सध्याच्या तिमाही म्हणजेच डिसेंबरपूर्वी दिवाळखोरीतील रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी निधी उभारण्यास सक्षम असेल. दरम्यान, रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सचा व्यवहार पुन्हा एकदा सुरू झाला आहे.

बुधवारी, आठवड्याच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी, रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सनं 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 11.94 रुपयांची पातळी गाठली. रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्सना सातत्यानं अपर सर्किट लागत आहे. एका आठवड्यात हा शेअर बीएसईच्या तुलनेत 27 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. सध्या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 12.39 रुपये आहे. ही किंमत 15 नोव्हेंबर 2022 रोजी होती. गेल्या पाच वर्षांत हा शेअर जवळपास 96 टक्क्यांनी घसरला आहे. या काळात त्याची किंमत 262 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत घसरली आहे.

फंड जमवण्याचे प्रयत्न
हिंदुजा समुहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IndusInd International Holdings Limited) ही रिलायन्स कॅपिटलसाठी एकमेव बोली लावणारी कंपनी ठरली आहे. आता हिंदुजा समूह संपादन पूर्ण करण्यासाठी निधी उभारत आहे. यासाठी हिंदुजा समुहानं रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स तारण ठेवण्याची परवानगी देण्याचं आवाहन भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (आयआरडीएआय) केलं होतं.

मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली. यानंतर हिंदुजा समूह इंटरनल सोर्स आणि खाजगी क्रेडिट कंपन्यांकडून पैसे उभारण्याचा विचार करत आहे. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, हिंदुजा ग्रुप अन्य समूह संस्थांचे शेअर्स गहाण ठेवून फंड जमवण्यावर विचार करू शकतो.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: This share fell from rs 262 to 11 now upper circuit The company to buy the giant group reliance capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.