Lokmat Money >शेअर बाजार > ₹२४०० वरुन ₹९ वर आला अनिल अंबानींच्या कंपनीचा हा शेअर, आता २५००% झाली वाढ

₹२४०० वरुन ₹९ वर आला अनिल अंबानींच्या कंपनीचा हा शेअर, आता २५००% झाली वाढ

11 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स शेअर्स 2486.05 रुपयांवर होते. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 03:08 PM2024-01-08T15:08:49+5:302024-01-08T15:09:45+5:30

11 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स शेअर्स 2486.05 रुपयांवर होते. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

This share of Anil Ambani s company reliance infrastructure fall rs 2400 to 9 now 2500 percent increase in four years | ₹२४०० वरुन ₹९ वर आला अनिल अंबानींच्या कंपनीचा हा शेअर, आता २५००% झाली वाढ

₹२४०० वरुन ₹९ वर आला अनिल अंबानींच्या कंपनीचा हा शेअर, आता २५००% झाली वाढ

अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स सोमवारी 7 टक्क्यांहून अधिक वाढून 246.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्ससाठी हा एका वर्षाचा नवा उच्चांक आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स शुक्रवारी 229.35 रुपयांवर होते. रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स त्यांच्या आजवरच्या उच्चांकावरून 99 टक्क्यांहून अधिक घसरले होते, कंपनीच्या शेअर्सची अवस्था वाईट होती. पण, गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 2500 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी दिसून येत आहे.

9 रुपयांवर आलेला शेअर

11 जानेवारी 2008 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स 2486.05 रुपयांवर होते. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 99 टक्क्यांहून अधिक घसरून 9.20 रुपयांवर पोहोचले. यानंतर गेल्या चार वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. 8 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 246.50 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 2565 टक्क्यांची वाढ झाली आहे.

3 वर्षांत 730 टक्क्यांची वाढ

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स (Reliance Infrastructure) गेल्या 3 वर्षात 730 टक्क्यांनी वाढले आहेत. 8 जानेवारी 2021 रोजी रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 29.35 रुपयांवर होते. 8 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 246.50 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये 82 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 135.05 रुपयांवरून 246.50 रुपयांपर्यंत वाढले. रिलायन्स इन्फ्राचे शेअर्स 6 महिन्यांत 80 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 114.60 रुपये आहे.

Web Title: This share of Anil Ambani s company reliance infrastructure fall rs 2400 to 9 now 2500 percent increase in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.