Lokmat Money >शेअर बाजार > 'या' कंपनीला मिळालं ₹२७८९० कोटींचं कंत्राट, आता बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय शेअर

'या' कंपनीला मिळालं ₹२७८९० कोटींचं कंत्राट, आता बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय शेअर

सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत असून यानं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:13 PM2023-09-04T13:13:51+5:302023-09-04T13:14:15+5:30

सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत असून यानं ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठलाय.

Titagarh Rail Systems Ltd got a contract of rs 27890 crore now the share is running at the speed of a bullet train investment | 'या' कंपनीला मिळालं ₹२७८९० कोटींचं कंत्राट, आता बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय शेअर

'या' कंपनीला मिळालं ₹२७८९० कोटींचं कंत्राट, आता बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय शेअर

Titagarh Rail Systems Ltd Order book: टीटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर्सवर सध्या अनेक गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सध्या सातत्यानं वाढ होत आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २.५५ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सनं ८३० रुपयांचा आपला ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर  गाठला होता. कंपनीला सातत्यानं मिळणाऱ्या मोठ्या ऑर्डर्समुळे शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेशी निगडीत या कंपनीला अनेक मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

गुजरात मेट्रो रेलकडून मिळालं काम
टीटागढला गेल्या आठवड्यात गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये आहे. ३० जून २०२३ पर्यंत कंपनीची ऑर्डर बूक २७,८९० कोटी रुपये (पॅसेंजर रोलिंग स्टॉक ऑर्डर १२,७१६ कोटी रुपये आणि फ्रेट रोलिंग स्टॉक ऑर्डर ६३०० कोटी रुपये) आहे.

जून तिमाहिचे उत्तम निकाल
आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहिच्या तुलनेत २०२४ या आर्थिक वर्षात निव्वळ विक्री ११०.८९ टक्क्यांनी वाढून ९१०.७६ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ५०४० टक्क्यांनी वाढून ६१.७८ कोटी रुपये झाला. याशिवाय कंपनीनं आपल्यावरील कर्जही कमी केलंय. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्याता आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Titagarh Rail Systems Ltd got a contract of rs 27890 crore now the share is running at the speed of a bullet train investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.