Lokmat Money >शेअर बाजार > 25 रुपयांचा शेअर आज 1400 पार; अवघ्या चार वर्षात दिला 5500% परतावा...

25 रुपयांचा शेअर आज 1400 पार; अवघ्या चार वर्षात दिला 5500% परतावा...

कंपनीचे शेअर अवघ्या एका दिवसात 11% पेक्षा जास्त वाढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:44 PM2024-05-29T17:44:42+5:302024-05-29T17:44:59+5:30

कंपनीचे शेअर अवघ्या एका दिवसात 11% पेक्षा जास्त वाढले.

Titagarh Rail Systems, Rs 25 share crosses 1400 mark today; 5500% returns in just 4 years | 25 रुपयांचा शेअर आज 1400 पार; अवघ्या चार वर्षात दिला 5500% परतावा...

25 रुपयांचा शेअर आज 1400 पार; अवघ्या चार वर्षात दिला 5500% परतावा...

Share Market : गेल्या काही काळापासून शेअर मार्केटमध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच रेल्वे स्टॉक 'टिटागड रेल सिस्टिम'चे (Titagarh Rail Systems) शेअर्स बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आहेत. बुधवारी(दि.29) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर टिटागड रेल सिस्टिम्सच्या शेअर्सने 11% पेक्षा जास्त उसळी घेऊन 1400 रुपयांचा टप्पा ओलांडला आणि 1413.45 रुपयांचा सर्वाधिक उच्चांक गाठला. 

टीटागड रेल्वेचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 5500% पेक्षा जास्त वाढले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून 1400 रुपयांपर्यंत वाढले. Titagarh Rail Systems च्या शेअर्सची 52 आठवड्यांची निम्न पातळी 346.70 आहे. तर, 4 वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर्स फक्त 25.15 रुपयांवर होते. आता 29 मे 2024 रोजी हे शेअर्स 1413.45 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे, या शेअरने गेल्या 4 वर्षात 5500% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी Titagar Rail Systems च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर 1 लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सचे सध्याचे मूल्य 56.19 लाख झाले असेल. गेल्या एका वर्षात कंपनीने 295% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 29 मे 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 356.15 रुपयांवर होते. टिटागड रेल सिस्टीम्सचे मार्केट कॅप 18800 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.


(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

Web Title: Titagarh Rail Systems, Rs 25 share crosses 1400 mark today; 5500% returns in just 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.