TATA ग्रुपवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला आहे.मोठ्या कालावधीनंतर TATA ग्रुपच्या या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.हा शेअर ज्वेलरी कंपनी टायटनचा आहे. टाटा ग्रुपच्या शेअरवर गुंतवणूकदार जास्त विश्वास ठेवतात.
एखाद्या गुंतवणूकदाराने २२ वर्षांपूर्वी दिवाळीला टायटनच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याला या दिवाळीत १ लाख टक्क्यांहून अधिक नफा झाला असेल, रक्कमेत पाहिले तर १० कोटींचा फायदा झाला असेल.
Vijay Mallya: विजय माल्ल्याकडून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं चांगलाच ट्रोल केला
Titan चे शेअर एनएसईवर वर्ष २००० मध्ये २७ ऑक्टोबर रोजी टायटनच्या शेअरची किंमत फक्त २.५६ रुपये होती. या दिवाळीत २१ ऑक्टोबरला टायटनच्या शेअर्सची किंमत २,६७०.६५ रुपयांवर पोहोचली आहे. Titanच्या शेअर्समध्ये २२ वर्षात १०४१९६.८८% वाढ झाली आहे. जर गुंतवणूकदाराने २२ वर्षांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर टायटनच्या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असेलतर त्यांना आज १०.४४ कोटी रुपयांचा फायदा झाला असता.
गेल्या पाच वर्षांत स्टॉक ३५२.६१% वाढला आहे. टायटनचे शेअर्स एका वर्षात १२.२५ टक्क्यांनी वर चढले आहेत. टायटनच्या समभागांनी या वर्षी YTD मध्ये ५.८२ टक्के परतावा दिला. गेल्या सहा महिन्यात स्टॉक ८.८३ टक्के पर्यंत वाढला. गेल्या पाच दिवसात स्टॉक २.२० टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत तिची एकूण विक्री वार्षिक १८ टक्क्यांनी वाढली आहे.