Lokmat Money >शेअर बाजार > Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स 

Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स 

Titan Share price: पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात टाटांच्या या कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:10 PM2024-08-05T13:10:25+5:302024-08-05T13:10:49+5:30

Titan Share price: पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात टाटांच्या या कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला.

Titan Share Low profit TATA share hit hard Sale by investors LIC holds 1 93 crore shares | Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स 

Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स 

Titan Share price: पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात टायटन कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला. मात्र त्यानंतर त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला. आज बीएसईवर टायटनचा शेअर ३२०१.०५ रुपयांवर उघडला, जो शुक्रवारच्या ३४६३.१५ रुपयांच्या बंद भावापेक्षा ७.५% कमी आहे. वास्तविक जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर थोडा सावरला.

कसे आहेत तिमाही निकाल?

ज्वेलरी रिटेलर आणि वॉचमेकर टायटनचा एकत्रित निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत ५.४२ टक्क्यांनी कमी होऊन ७१५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ७५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र, या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री १२.६४ टक्क्यांनी वाढून १२,२२३ कोटी रुपयांवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत १०,८५१ कोटी रुपये होती, असं टायटननं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. जून तिमाहीत टायटनचा एकूण खर्च १२.७५ टक्क्यांनी वाढून १२,४१३ कोटी रुपये झाला आहे.

जून तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न ११.४४ टक्क्यांनी वाढून १३,३८६ कोटी रुपये झालं आहे. या तिमाहीत टायटनचा दागिन्यांच्या व्यवसायातून मिळणारा महसूल १०.४ टक्क्यांनी वाढून ११,८०८ कोटी रुपये झालाय. टायटनचा ब्रँड तनिष्कनं ओमानमधील मस्कत मध्ये नवीन स्टोअर सुरू करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं अस्तित्व मजबूत केलंय. यामुळे टायटनची भारताबाहेर आता १७ आउटलेट्स आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे कोअर ज्वेलरी व्यवसायातील मागणीत अडथळा निर्माण झाला आणि परिणामी टायटन कंपनीच्या निव्वळ नफ्यात संथ वाढ झाली.

काय आहे टार्गेट प्राईज?

ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीनं टायटनच्या शेअरमध्ये आणखी वाढ होऊ शकते असं म्हटलं आहे. मॅक्वायरीनं ४,१०० रुपये प्रति शेअरच्या टार्गेट प्राइससह आपलं आऊटपरफॉर्म कॉल कायम ठेवला आहे. जेपी मॉर्गननंही प्रति शेअर ३,४५० रुपयांच्या टार्गेटसह न्यूट्रल कॉल कायम ठेवला आहे. दरम्यान, सिटीनं शेअरबाबत न्यूट्रल कॉल कायम ठेवत टार्गेट प्राइस ३,५१० रुपये प्रति शेअर पर्यंत वाढवली आहे. गोल्डमन सॅक्सनं ३,७५० रुपयांच्या वाढीव टार्गेटसह शेअरवर 'बाय' रेटिंग कायम ठेवलं आहे. एलआयसीकडे टायटनचे १,९२,७६,८६१ शेअर्स आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Titan Share Low profit TATA share hit hard Sale by investors LIC holds 1 93 crore shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.