शेअर बाजारात शुक्रवारी टाटा समूहाची कंपनी असलेल्या टायटनच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. शिक्रवारी टायटनचा शेअर 3709.15 रुपयांवर बंद झाला होता. एक दिवस आधीच्या तुलनेत या शेअरमध्ये 2.21% ची तेजी आली आहे. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 3725 रुपयांवर पोहचली. या स्टॉकसंदर्भात एक्सपर्ट बुलिश दिसत आहेत.
शेअर टार्गेट प्राइस -
टाटा समूहाच्या या शेअरवर एक्सपर्ट बुलिश दिसत आहेत. ब्रोकरेज ICICI सिक्योरिटीजने टायटनच्या शेअरचे टार्गेट प्राइस 3810 रुपये एवढे ठेवले असून खरेदीचाही सल्ला दिला आहे. गेल्या 30 जानेवारी 2024 रोजी या शेअरची किंमत 3,885 रुपयांपर्यंत पोहोचली होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांचा उच्चांक होता.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी म्हटले आहे की, गुंतवणूकदारांनी ₹3,575 च्या जवळपास घसरणीवर हा स्टॉक खरेदी करण्यासंदर्भात विचार करायला हवा. तसेच, तांत्रिक विश्लेषण आणि बाजाराच्या सध्य स्थितीचा विचार करता टायटन ₹3900 पर्यंतही पोहोचू शकतो, असेही बागडिया यांनी म्हटले आहे.
असे आहेत तिमाही निकाल -
टायटन लिमिटेडने डिसेंबर तिमाही दरम्यान 14,300 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले होते. जी सप्टेंबर तिमाहीच्या 12653.00 कोटी रुपयांपेक्षा 13.02% ने अधिक आहे. तसेच गेल्या वर्षाच्या याच तिमाहिच्या तुलनेत 22.24% ने अधिक आहे. कंपनीने तिमाहीमध्ये 1053.00 कोटी रुपयांचा प्रॉफिट मिळवला आहे.
असा आहे शेअरहोल्डिंग पॅटर्न -
कंपनीमध्ये 31 दिसंबर 2023 पर्यंत प्रमोटर्सचा वाटा 52.9 टक्के एवढा होता. तर एफआयआयचा वाटा 18.89 टक्के आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 10.21 टक्के एवढा होता.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)