Join us  

Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 3:21 PM

बीएसई सेन्सेक्सच्या टॉप-10 पैकी 9 कंपन्यांची 97,463.46 कोटी रुपयांची कमाई.

Top-10 Firms Market Cap : शेअर बाजारात (Share Market) सलग दोन आठवडे डाउनफॉल पाहिल्यानंतर मागील आठवडा गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगला ठरला. बीएसई सेन्सेक्समधील (BSE Sensex) टॉप-10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली. या काळात मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI नेही आपल्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली.

मार्केट कॅपमध्ये भरगोस वाढगेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 580.98 अंक किंवा 0.91 टक्क्यांनी वधारला, ज्यामुळे 9 कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) 97,463.46 कोटी रुपयांची भर झाली. या कालावधीत सेन्सेक्सच्या चार कंपन्यांचे बाजार भांडवल 10 वरुन 30 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले, तर बजाज फायनान्स ही एकमेव कंपनी होती, जिच्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला.

रिलायन्स-एसबीआयच्या गुंतवणूकदारांची चांदीगेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​बाजार भांडवल (Reliance Market Cap) 15,68,995.24 कोटी रुपयांवर पोहोचले, ज्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना 36,399.36 कोटी रुपयांची फायदा झाला. कमाईच्या बाबतीत दुसरी सर्वात मोठी कंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) होती, ज्याचे मार्केट कॅप रु. 15,305.71 कोटींनी वाढून 5,15,976.44 कोटी रुपये झाले.

या कंपन्यांचे मूल्यही वाढलेICICI बँकेचे मार्केट कॅप  (ICICI Bank MCap) 14,749.52 कोटी रुपयांनी वाढून 6,54,042.46 कोटी रुपये झाले, HDFC बँकेचे बाजार मूल्य (HDFC Bank MCap) 11,657.11 कोटी रुपयांनी वाढून 11,25.8942.46 कोटी रुपये झाले. तर, दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलचा एमकॅप (Airtel Market Cap) 9,352.15 कोटी रुपयांनी वाढून 5,23,087.22 कोटी रुपयांवर पोहोचला.

याशिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल (HUL MCap) 6,320.4 कोटी रुपयांनी वाढून 5,89,418.46 कोटी रुपये आणि Infosys चे MCap (Infosys Market Value) 3,507.08 कोटी रुपयांनी वाढून 5,76,529.86 कोटी रुपये झाले. टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसने (TCS Market Cap) 109.77 कोटी रुपयांचा नफा कमावला आणि तिचे मार्केट कॅप 12,26,093.23 कोटी रुपये झाले. नववी कमाई करणारी कंपनी ITC लिमिटेड होती, ज्याचा MCap रु. 62.36 कोटींनी वाढून रु. 5,40,699.70 कोटींवर पोहोचला.

(टीप- आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूकपैसारिलायन्समुकेश अंबानी