Join us  

Reliance चे गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या पाच दिवसांत छापले रु. 15000 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 5:53 PM

Top-10 Firms Market Cap Update : सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी 'या' सहा कंपन्यांचे 57,000 कोटी रुपये बुडाले.

Top-10 Firms Market Cap Update : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात (Share Market) मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. या दरम्यान सेन्सेक्सच्या टॉप-10 कंपन्यांपैकी (Top-10 Firms Market Cap) सहा कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे 57,000 कोटी रुपये बुडाले. पण, या काळात मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवला आणि अवघ्या पाच दिवसांत 15,000 कोटी रुपये छापले.

सहा कंपन्यांचे 57000 कोटी बुडालेवर्षाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराने नवीन उचांक गाठत 72,561.91 चा आकडा पार केला. पण, नंतर संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स 214.11 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांनी घसरला. या कालावधीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), टाटा समूह (Tata Group) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) सह टॉप-6 कंपन्यांमध्ये मोठी घट झाली. यामुळे त्यांचे एकूण बाजार भांडवल संयुक्तपणे 7,408 कोटी रुपयांनी कमी झाले. 

सर्वाधिक तोटा करणाऱ्या कंपन्यागुंतवणूकदारांचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत TCS पहिल्या स्थानावर आहे. कंपनीचे मार्केट कॅप रु. 20,929.77 कोटींनी घसरून रु. 13,67,661.93 कोटी झाले. यानंतर एचडीएफसी बँकेचे एमकॅप 20,536.48 कोटी रुपयांनी घटून 2,77,435.56 कोटी रुपये झाले. तिसऱ्या क्रमांकावर हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL) होते, जिचे मूल्य 10,114.99 कोटी रुपयांनी घसरून 6,15,663.40 कोटी रुपयांवर आले.

रिलायन्ससह या कंपन्यांची चांदीमुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमकॅप 17,63,644.77 कोटी रुपयांपर्यंत वाढले. त्यानुसार पाच दिवसांत कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 14,816.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय, ITC लिमिटेडचा MCap देखील 14,409.32 कोटी रुपयांनी वाढून 5,91,219.09 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारती एअरटेलचे बाजार भांडवल 8,200.55 कोटी रुपयांनी वाढून 5,88,846.09 कोटी रुपयांवर पोहोचले. तर LIC चा MCap रु. 7,020.75 कोटींच्या वाढीसह 5,34,082.81 कोटींवर पोहोचला आहे.

(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूकरिलायन्स