Top-10 Firms Market Value : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Induustries) शेअर धारकांसाठी गेला आठवडा खूप चांगला ठरला. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 90,000 कोटींहून अधिकची प्रचंड वाढ झाली. या कालावधीत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30 शेअर्सच्या सेन्सेक्सने 542.3 अंक किंवा 0.75 टक्क्यांनी वाढ नोंदवली, आणि सर्वकालीन उच्चांक गाठला.
पाच कंपन्यांची 1.99 लाख कोटींची कमाई
पीटीआयच्या मते, गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या (Sensex) टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 5 (Top-10 Firms Market Cap) कंपन्यांच्या च्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली आणि त्यांचे एकूण मार्केट कॅप 1,99,111.06 कोटी रुपयांनी वाढले. या कालावधीत, मुकेश अंबानींची रिलायन्स आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त लाभ देणाऱ्या कंपन्यांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सर्वात जास्त नुकसान एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचे झाले.
रिलायन्स-टीसीएसच्या गुंतवणूकदारांना लाभ
गेल्या आठवड्यातील आकडेवारी पाहिल्यास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप (Reliance MCap) 90,220.4 कोटी रुपयांनी वाढून 18,53,865.17 कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्सप्रमाणेच टाटा समूहाच्या TCS नेही गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. कंपनीचे बाजार भांडवल (TCS MCap) 14,20,333.97 कोटी रुपये झाले. म्हणजेच, TCS मध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांच्या संपत्तीत एका आठवड्यात 52,672.04 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
या कंपन्यांचीही चांदी
आठवडाभरात IT दिग्गज इन्फोसिसचे बाजार मूल्य (Infosys Mcap) रु. 32,913.04 कोटींनी वाढून रु. 6,69,135.15 कोटीवर पोहोचले. भारती एअरटेलचे बाजार मूल्य (Bharti Airtel MCap) 16,452.93 कोटी रुपयांनी वाढून 6,05,299.02 कोटी रुपये झाले, तर ICICI बँकेचे बाजार मूल्य (ICICI Bank MCap) 6,852.65 कोटी रुपयांनी वाढून 7,04,210.07 कोटी रुपये झाले.
एचडीएफसीसह या कंपन्यांचे नुकसान
ज्या पाच कंपन्यांचे मार्केट कॅप घसरले, त्यात एचडीएफसी बँक पहिल्या स्थानावर होती. बाजार भांडवल (HDFC Bank MCap) रु. 32,609.73 कोटींनी घसरुन रु. 12,44,825.83 कोटी झाले. याशिवाय हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL MCap) चे MCap 17,633.68 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,98,029.72 कोटी रुपयांवर आले, तर LIC मार्केट कॅप 9,519.13 कोटी रुपयांनी कमी होऊन ते 5,24,563.68 कोटी रुपयांवर घसरले.
(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)