शेअर बाजारातीलगुंतवणूकीवर जसा चांगला नफा मिळतो, तसं चुकीच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठं नुकसानही होऊ शकतं. यामुळे योग्य अभ्यास करूनच यात पैशांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगली वाढ झाल्याचं दिसून येतंय. तर नुकताच शेअर बाजाराच्या निर्देशांकानं उच्चांकी स्तरही गाठला होता. दरम्यान, कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला नफा कमावू शकता हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.
येत्या काळात रियल इस्टेट, ऑटोमोबाईल, बिल्डिंग मटेरियल, अप्लायन्सेस सेक्टरशी निगडीत कंपन्या चांगली कामगीरी करू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार या क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलियोमध्ये जोडू शकतात असं मत शेअर बाजाराचे जाणकार आणि एलिक्सिर इक्विटीजचे संचालक दीपन मेहता यांनी व्यक्त केलं.
एफएमजीसी सेक्टरशी निगडीत स्टॉक्सनं चांगली कामगिरी केली असून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आगेत. मल्टिप्लेक्स आणि हेल्थकेअर चांगले पर्याय ठरू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
लार्ज कॅप, मिड कॅप स्टॉक्स ठेवा
गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलियोमध्ये लार्ज कॅप आणि मिड कॅप असे दोन्ही शेअर्स ठेवले पाहिजे, असं दीपन मेहता म्हणाले. येणाऱ्या काही तिमाहींमध्ये जर अमेरिकेची अर्थव्यवस्था स्थिर झाली, तर आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या खर्चात सुधारणा होऊ शकते. यामुळे सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.
मान्सूनचा प्रभाव
आतापर्यंत अशी मान्सूनची स्थिती पाहिली नाही. मान्सूनचा प्रभाव बाजारातील अनेक क्षेत्रांवर दिसून येऊ शकतो. परंतु भारतीय बाजारात विविधता असल्यानं अन्य क्षेत्र आपला चांगला परफॉर्मन्स पुढेही सुरू ठेवू शकतात.
(टीप - यामध्ये देण्यात आलेले तज्ज्ञांचे वैयक्तिक विचार आहेत. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहेत.)