Lokmat Money >शेअर बाजार > दोन भाऊ देणार 5000 कोटींचे दान; कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी, 3 महिन्यांत 51% वाढ

दोन भाऊ देणार 5000 कोटींचे दान; कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी, 3 महिन्यांत 51% वाढ

Torrent Group Share Price: ही रक्कम आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रांसाठी वापरली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:30 PM2024-04-01T15:30:18+5:302024-04-01T15:31:00+5:30

Torrent Group Share Price: ही रक्कम आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रांसाठी वापरली जाईल.

Torrent Group: Two brothers to donate Rs 5000 crore; Shares of the company boomed up 51% in 3 months | दोन भाऊ देणार 5000 कोटींचे दान; कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी, 3 महिन्यांत 51% वाढ

दोन भाऊ देणार 5000 कोटींचे दान; कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी, 3 महिन्यांत 51% वाढ

Torrent Group: देशात असे अनेक अब्जाधीश उद्योगपती आहेत, जे कमाईसोबतच दान-धर्म करण्यातही अग्रेसर असतात. अशाच उद्योगपतींमध्ये टोरेंट ग्रुपचे अब्जाधीश बंधू सुधीर आणि समीर मेहता यांचेही नाव आहे. टोरेंट ग्रुपच्या मेहता बुंधुंनी येत्या 5 वर्षांत 5000 कोटी रुपयांचे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम UNM फाउंडेशनला दान करण्यात येणार आहे. UNM फाउंडेशनचे नाव UN मेहता यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. सामाजिक कार्यासाठी हे दान करण्याचा निर्णय ग्रुपने घेतला आहे.

देणगी कुठे वापरली जाईल?
मेहता कुटुंबाच्या संपत्तीमधील मोठा भाग टोरेंट फार्मामधून मिळतो. ही $5 अब्ज ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. दरम्यान, टोरेंट ग्रुपकडून मिळालेल्या माहितीनुसार, दान केली जाणारी रक्कम UNM फाउंडेशनद्वारे आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि कला, या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाईल. ग्रुपने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही रक्कम टोरेंट ग्रुपच्या CSR योगदानाव्यतिरिक्त असेल. 

टोरेंटचे शेअर्स वाढले
आज, 1 एप्रिलपासून या देणगीला सुरुवात करणार होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, Torrent Pharmaceuticals Ltd चे शेअर्स आज 2.83 टक्क्यांच्या वाढीसह 2,674.15 च्या पातळीवर आले आहेत. गेल्या 6 महिन्यांत शेअरमध्ये 42.22 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 6 महिन्यांच्या कालावधीत या शेअरच्या किमतीत 793.90 रुपयांची वाढ झाली आहे. या ग्रुपची स्थापना 1959 साली झाली होती.

(टीप-शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: Torrent Group: Two brothers to donate Rs 5000 crore; Shares of the company boomed up 51% in 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.