Power Stocks: पॉवर कंपनी Torrent Powerला वीकेंडला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (16 मार्च) टॉरंट पॉवरला 3650 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरनुसार, कंपनीला 300 मेगावॅट (आरई पॉवर) ग्रिड-कनेक्टेड विंड सोलर हायब्रीड प्रकल्प सेटअप करायचा आहे. ही ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीचा स्टॉक सोमवारी(दि.18) दमदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
Torrent Power ला 300 MW (RE Power) ग्रिड-कनेक्टेड विंड सोलर हायब्रिड प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) मिळाला आहे. पॉवर टॅरिफ ₹ 3.65 प्रति किलोवाट आहे. पॉवर पर्चेज अॅग्रीमेंट (PPA) द्वारे प्रोजेक्ट 24 महीन्यांत सुरू होईल. प्रकल्पाचा कालावधी कॉन्ट्रॅक्ट सुरू झाल्यानंतर 25 वर्षे असेल. 50% CUF आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंपनीने करार क्षमतेच्या विरुद्ध 480 मेगावॅट पवन आणि 300 मेगावॅट सौर क्षमता स्थापित करण्याची योजना आखली आहे.
टोरेंट पॉवर शेअर किंमत
गेल्या आठवड्यात कंपनीच्या स्टॉकने सुमारे 1.5 टक्के आणि 2 आठवड्यात सुमारे 4 टक्के परतावा दिला. क्लोजिंग बेसिसवर, या वर्षी आतापर्यंत सुमारे 23 टक्के, तीन महिन्यांत 29 टक्के, सहा महिन्यांत 60 टक्के, एका वर्षात 116 टक्के आणि दोन वर्षांत 143 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 15 मार्च रोजी हा शेअर 1160.80 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. आता सोमवारी हा दमदार परतावा देण्याची अपेक्षा आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)