Lokmat Money >शेअर बाजार > ट्रेडिंग करता? डिमॅट खात्यांबाबत गुंतवणूकदारांना सेबी दिलासा देण्याच्या तयारीत, जाणून घ्या

ट्रेडिंग करता? डिमॅट खात्यांबाबत गुंतवणूकदारांना सेबी दिलासा देण्याच्या तयारीत, जाणून घ्या

डिमॅट खात्यांसंदर्भात सेबी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:46 PM2023-11-08T15:46:32+5:302023-11-08T15:46:42+5:30

डिमॅट खात्यांसंदर्भात सेबी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Trading As SEBI prepares to provide relief to investors on demat accounts know details | ट्रेडिंग करता? डिमॅट खात्यांबाबत गुंतवणूकदारांना सेबी दिलासा देण्याच्या तयारीत, जाणून घ्या

ट्रेडिंग करता? डिमॅट खात्यांबाबत गुंतवणूकदारांना सेबी दिलासा देण्याच्या तयारीत, जाणून घ्या

बाजार नियामक सेबी डिमॅट खात्यांना निष्क्रिय घोषित करण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या तयारीत आहे. सेबीच्या नवीन प्रस्तावानुसार, आता डिमॅट खात्यात 12 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार न झाल्यास ते निष्क्रिय मानले जाईल. यापूर्वी हा कालावधी सहा महिन्यांचा होता. या पावलामुळे डिमॅट खातेदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

असं सांगितलं जात आहे की डिमॅट खात्यांच्या निष्क्रियतेबाबत सेबीचे नवीन नियम लवकरच लागू होऊ शकतात. सर्व एक्सचेंज आणि डिपॉझिटरीजमध्ये समान नियम लागू होतील. सध्याच्या नियमांनुसार, वर्षातून एकदा शेअर्स खरेदी विक्रीसाठी डील करतो तो सक्रिय खाती किंवा शेअर बाजारातील सक्रिय गुंतवणूकदार असल्याचं मानलं जातं. 

७५ टक्के खाती सक्रिय नाही
सेबीच्या रिपोर्टनुसार, देशातील डिमॅट खात्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, परंतु सक्रिय ट्रेडर्सच्या संख्येत घट झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीपर्यंत देशात सक्रिय डीमॅट खात्यांची संख्या सुमारे 3.5 कोटी होती, जी या वर्षी मार्च अखेरीस 3.19 कोटींवर आली आहे. त्याच वेळी, ऑगस्टमध्ये केवळ 3.15 सक्रिय खाती शिल्लक होती. म्हणजेच एकूण डिमॅट खात्यांपैकी 75 टक्क्यांहून अधिक खाती सक्रिय नाहीत.

नव्या प्रस्तावानुसार 12 महिन्यांपर्यंत शेअर्सची खरेदी विक्री न झाल्यास डिमॅट खातं निष्क्रिय मानलं जाईल. परंतु म्युच्युअल फंड एसआयपी, राईट्स इश्यू इत्यादींसाठी अर्ज केला असल्यास खातं सक्रिय मानलं जाईल. बोनस, स्टॉक स्प्लिट्ससाठी हे मान्य नसेल.

Web Title: Trading As SEBI prepares to provide relief to investors on demat accounts know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.