शेअर बाजारात एक एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत. ट्रेडरांसाठी फ्युचर्स आणि पर्यायांमध्ये ट्रेडिंग महागणार आहे. केंद्र सरकारने फायनान्स बिल २०२३ मध्ये फ्युचर्स आणि ऑप्शनच्या विक्रीवर लागणाऱ्या सिक्युरिटी ट्रान्झेक्शन टॅक्समध्ये वाढ केली आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या फायद्यावर होणार आहे.
STT किती वाढला फायनान्स बिल 2023 मध्ये, रोखे व्यवहार कर 0.05 टक्क्यांवरून 0.062 टक्के करण्यात आला आहे. अशा प्रकारे एसटीटीमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. याचा अर्थ 100 रुपयांवर लागणाऱ्या 5 पैशांवजी STT 6.2 पैसे आकारला जाणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यापाऱ्याची फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये 1 कोटी रुपयांची उलाढाल असेल, तर त्याला 5,000 रुपयांऐवजी 6,250 रुपये STT भरावा लागणार आहे.
हे विधेयक 2023 बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आले आणि मंजूर करण्यात आले. हे बदल १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. येत्या महिन्यापासून ट्रेडर्सना जादा कर भरावा लागणार आहे.
शेअर बाजारात आणखी एक बदल होणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने स्टॉक ऑप्शन्समधील ऑटो सेटलमेंट 1 एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.