Transteel Seating Tech IPO Listing: एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी फर्निचर पुरवणाऱ्या ट्रान्सस्टील सिटिंग टेकच्या (Transteel Seating Tech) शेअर्सची जबरदस्त एन्ट्री झाली. या IPO ला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ 49 पेक्षा अधिक पट सबस्क्राईब झाला होता. आयपीओ अंतर्गत ७० रुपयांच्या दरावर हे शेअर्स जारी करण्यात आले होते.
सोमवारी हे शेअर्स एनएसई एसएमईवर 88.90 रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाले. याचा अर्थ आयपीओच्या गुंतवणूकदारांना 27 टक्के (Transteel Listing Gain) लिस्टिंग गेन मिळाला आहे. लिस्टिंगनंतरही या शेअरमधील तेजी कायम होती. यानंतर कंपनीचा शेअर 93.30 रुपयांवर पोहोचला आणि यावर शेअरला अपर सर्किटही लागलं. दरम्यान, याचा अर्थ IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे.
कंपनीचा 49.98 कोटी रुपयांचा आयपीओ 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आणि तो 49.21 पट सबस्क्राइब झाला. यामध्ये, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (QIB) आरक्षित हिस्सा 12.15 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 122.88 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 39.82 पट सबस्क्राईब झाला होता. या IPO अंतर्गत 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले 49.98 कोटी रूपये किमतीचे 71.40 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. उर्वरित 3.56 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत जारी करण्यात आले.
कंपनीबाबत माहिती
ट्रान्सटील सिटिंग टेकचा व्यवसाय 1995 मध्ये सुरू झाला. ही कंपनी कॉर्पोरेट आणि बी2बी क्षेत्रांना फर्निचर पुरवण्याचं काम करते. कंपनीचे प्रकल्प यशवंतपूर, बंगळुरू येथे आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तर कंपनीची आर्थिक स्थिती सातत्यानं मजबूत होत आहे. 2021 च्या आर्थिक वर्षात कंपनीला 59 हजार रुपयांचा तोटा झाला होता. यानंतर, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1.59 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये वाढून 9.09 कोटी रुपये झाला. या आर्थिक वर्ष 2023-24 बद्दल सांगायचं झालं तर एप्रिल-सप्टेंबर 2023 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीला 4.18 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय.