Lokmat Money >शेअर बाजार > शेअर आहे की, कुबेराचा खजिना; वर्षभरात 1 लाखाचे झाले 8 लाख...

शेअर आहे की, कुबेराचा खजिना; वर्षभरात 1 लाखाचे झाले 8 लाख...

TRIL Share Price: वर्षभरात या शेअरने 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 02:52 PM2024-04-10T14:52:02+5:302024-04-10T14:53:04+5:30

TRIL Share Price: वर्षभरात या शेअरने 700 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

TRIL Share Price: One lakh became 8 lakh in a year | शेअर आहे की, कुबेराचा खजिना; वर्षभरात 1 लाखाचे झाले 8 लाख...

शेअर आहे की, कुबेराचा खजिना; वर्षभरात 1 लाखाचे झाले 8 लाख...

Share Market Tips: शेअर बाजार दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. मंगळवार(दि.9) सेन्सेक्सने 75000 चा टप्पा पार केला. तसेच, बाजाराचे एकूण मार्केट कॅप चार लाख कोटींच्या पुढे गेले. या दरम्यान, एक स्टॉक असा आहे, जो गेल्या 12 दिवसांपासून सातत्याने वाढ नोंदवत आहे. या शेअरने केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना सातपट परतावा दिला आहे. 700 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या या कंपनीचे नाव ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया लिमिटेड (TRIL) असून, गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सनी चमकदार कामगिरी केली आहे. 

शेअरला 5% अप्पर सर्किट लागले
मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर हा स्टॉक 5% च्या अप्पर सर्किटवर लॉक झाला होता. यामुळे या शेअरची किंमत 498.20 रुपये झाली. विशेष म्हणजे, TRIL चे शेअर्स पाच ट्रेडिंग सत्रांत 18% पेक्षा जास्त, एका महिन्यात 52% पेक्षा जास्त, सहा महिन्यांत जवळजवळ 200% आणि एका वर्षात 738% ने वाढले आहेत. 2024 मध्येच स्टॉकने गुंतवणूकदारांना सुमारे 110% नफा दिला.

कंपनीच्या शेअर्समधील ही वाढ आर्थिक वर्ष 2024 मध्ये 35.65 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवल्यानंतर सुरू झाली. Q4FY23 मध्ये 8.85 कोटी रुपयांच्या तुलनेत, यंदा 300% पेक्षा जास्त वाढ झाली. आर्थिक वर्ष 24 मध्ये कंपनीचा एकूण नफा वाढून 4,111 कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्षात 3,709 कोटी रुपये होता. नुकत्याच झालेल्या वाढीनंतर ब्रोकरेज कंपन्याही या शेअर्सवर नजर ठेवून आहेत. ब्रोकरेजला अपेक्षा आहे की, कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमुळे स्टॉक आणखी 15% वाढू शकेल.

शेअरची कामगिरी
11 एप्रिल 2023 रोजी TRIL चे शेअर्स 62 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. त्यानंतर मे महिन्यात हा शेअर 63 रुपयांवर आला. 1 सप्टेंबर 2023 रोजी शेअरची किंमत 117 रुपयांवर बंद झाली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला हा शेअर 163 रुपयांवर आला. जानेवारीमध्ये वाढून 240 रुपये झाला आणि 1 मार्चला तर थेट 347 रुपयांवर पोहोचला. आता 9 एप्रिलला शेअर 494 रुपयांवर बंद झाला. बुधवारच्या व्यवहारातही त्यात वाढ होताना दिसत आहे.

1 लाखाचे झाले 8 लाख 
जर तुम्ही या स्टॉकमध्ये गेल्या वर्षी 62 रुपयांप्रमाणे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता 494 रुपये दराने तुम्हाला 7.96 लाख रुपये मिळाले असते. या शेअरने अवघ्या एका वर्षात 796 टक्के परतावा दिला आहे.

(टीप-शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: TRIL Share Price: One lakh became 8 lakh in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.