Lokmat Money >शेअर बाजार > परदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका! शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी धडाम; ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान

परदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका! शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी धडाम; ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. आजच्या सत्रात तब्बल ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:58 PM2024-10-22T15:58:37+5:302024-10-22T16:00:49+5:30

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. आजच्या सत्रात तब्बल ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

tsunami in indian stock market due selling by fii sensex nifty midcap smallcap stocks crashes investors wealth erodes by 8 50 lakh crore | परदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका! शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी धडाम; ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान

परदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका! शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी धडाम; ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदारांनी धोका दिला. परिणामी मंगळवारचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत अशुभ ठरले. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे बाजारात खळबळ उडाली होती. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स १००० अंकांनी तर निफ्टी ३३० अंकांनी घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरणीची त्सुनामी आली. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स ९३० अंकांनी घसरून ८०,२२० वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३१० अंकांच्या घसरणीसह २४,४७२ अंकांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटींचे नुकसान
भारतीय शेअर बाजारात आज आलेल्या घसरणीच्या वादळात गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये उडून गेले. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ४४४.७९ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात ४५३.६५ लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना ८.८४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गेल्या २ सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अनेक शेअर्स कोसळले
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी केवळ एक शेअर वाढीसह बंद झाला. तर उर्वरीत २९ शेअर्स तोंडावर आपटले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी फक्त ३ शेअर्स वधारले. बाकी ४७ शेअर्सने गुंतवणूकदारांना निराश केलं. आयसीआयसीआय बँक ०.७४, इन्फोसिस ०.४, नेस्ले ०.१० टक्के वधारले. तर बीईएल ३.७९ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.६३ टक्के, कोल इंडिया ३.३६ टक्के, अदानी एंटरप्रायझेस ३.२९ टक्के, एसबीआय २.९७ टक्के, पॉवर ग्रीड २.७९ टक्के घसरले.

सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण
बाजारातील आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रांत घसरण दिसून आली. निफ्टी बँक ७०५ अंकांनी, निफ्टी एनर्जी ९७५ अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ग्राहकोपयोगी वस्तू, तेल, धातू, फार्मा, एफएमसीजी, आयटी, वाहन, तेल आणि वायू या सर्व क्षेत्रांचे समभाग घसरले. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १५०३ अंकांवर बंद झाला आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक ७३६ अंकांनी घसरला. बाजारातील या घसरणीमुळे इंडिया व्हिक्स ४.५८ टक्क्यांच्या उसळीसह १४.३९ च्या पातळीवर बंद झाला.
 

Web Title: tsunami in indian stock market due selling by fii sensex nifty midcap smallcap stocks crashes investors wealth erodes by 8 50 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.