Join us

TTML Share Price: TATA चा २ रुपयांचा 'हा' शेअर पोहोचला ९० पार; १ लाखांचे झाले ४६ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 2:45 PM

TTML Share Price: टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. गुरुवारी हा शेअर १५ टक्क्यांनी वधारुन ९३ रुपयांच्या पार पोहोचला.

TTML Share Price: टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या (टीटीएमएल) शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारी टीटीएमएलचा शेअर १५ टक्क्यांनी वधारून ९३.७५ रुपयांवर पोहोचला. गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ४४०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत टीटीएमएलचा शेअर २ रुपयांवरून ९० रुपयांवर गेला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १०९.१० रुपये आहे. तर टीटीएमएलच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६५.२९ रुपये आहे.

१ लाखाचे झाले ४६ लाख

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (टीटीएमएल) चा शेअर ९ एप्रिल २०२० रोजी २.०३ रुपयांवर होता. १८ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ९३.७५ रुपयांवर पोहोचला आहे. टीटीएमएलच्या शेअरमध्ये ४ वर्षांत ४४००% पेक्षा जास्त वाढ झाली. जर एखाद्या गुंतवणूकदारानं ९ एप्रिल २०२० रोजी टीटीएमएलच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या १ लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत ४६.१८ लाख रुपये झाली असती.

३ वर्षांत ११० टक्क्यांची तेजी

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या (टीटीएमएल) शेअरमध्ये गेल्या तीन वर्षांत ११० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १६ जुलै २०२१ रोजी टीटीएमएलचा शेअर ४४.३० रुपयांवर होता. १८ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ९३.७५ रुपयांवर पोहोचला आहे. ७ जानेवारी २०२२ रोजी टीटीएमएलच्या शेअरने २६४ रुपयांचा उच्चांक गाठला. गेल्या वर्षभरात टीटीएमएलच्या शेअरमध्ये २७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १८ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर ७३.३४ रुपयांवर होता. १८ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ९३.७५ रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार