Join us

TTML Share : रॉकेट बनला TATA चा शेअर; ₹१ वरून आला ₹११०वर; आता २४ जुलै महत्त्वाचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:05 PM

TTML Share: कंपनीचा शेअर आज ८ टक्क्यांनी वधारला आणि ११० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या ५ कामकाजाच्या दिवसांपासून टाटा ग्रुपच्या या शेअरनं रॉकेट स्पीड पकडला आहे.

TTML Share: टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) (TTML Share) या कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीचा शेअर आज ८ टक्क्यांनी वधारला आणि ११० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या ५ कामकाजाच्या दिवसांपासून टाटा ग्रुपच्या या शेअरनं रॉकेट स्पीड पकडला आहे. पाच दिवसांत हा शेअर जवळपास ५० टक्क्यांनी वधारला. 

शुक्रवारी बीएसईवर हा शेअर १४ टक्क्यांनी वधारून २० महिन्यांतील उच्चांकी १११.४८ रुपयांवर पोहोचला. यापूर्वी टीटीएमएलच्या शेअरमध्ये सातत्याने नफावसुली सुरू होती आणि हा शेअर ७० रुपयांच्या खाली पोहोचला होता. याची ५२ आठवड्यांतील नीचांकी किंमत ६५.२९ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २०,९९९.८३ कोटी रुपये आहे. २७ मार्च २०२० रोजी या शेअरची किंमत १ रुपया होती. म्हणजेच या शेअरमध्ये आतापर्यंत १०,९००% वाढ झाली आहे.

कंपनीचा व्यवसाय काय?

टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड आणि त्याची उपकंपनी टीटीएमएल (टाटा टेलिसर्व्हिसेस) ही एंटरप्राइझ क्षेत्रातील वाढती मार्केट लीडर आहे. टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) या ब्रँड नावानं देशातील व्यवसायांसाठी कनेक्टिव्हिटी, सहकार्य, क्लाउड आणि एसएएएस, सुरक्षा आणि मार्केटिंग सोल्यूशन्सचा हा मोठा पोर्टफोलिओ प्रोव्हायडर आहे. टाटा टेलिसर्व्हिसेसकडे विस्तृत, उच्च गुणवत्तेचे आणि मजबूत वायरलाइन नेटवर्क आहे आणि भारतातील ६० पेक्षा अधिक शहरांमध्ये आपली उत्पादनं आणि सेवा प्रदान करते.

टाटा समूहाच्या कंपनीने नुकत्याच एका एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, बुधवारी, २४ जुलै २०२४ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक होणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार