Join us  

धमाल शेयर! दिला 3100 टक्क्यांचा बम्पर परतावा, ₹10000 चे झाले ₹3 लाख; थोडा धीर धरणाऱ्यांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 12:09 AM

या कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3100% एवढा छप्परफाड परतावा दिला आहे.

शेअर बाजारात केलेली छोटी गुंतवणूकहीगुंतवणूकदारांची चांदी करू शकते. असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या छट्या गुंतवणूकीवरही बम्पर परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे दिचाकी कंपनी TVS मोटर्सचा. या कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3100% एवढा छप्परफाड परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 3 लाख रुपये झाले असते. 

काय आहे शेअरची किंमत- आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर या शेयरची किंमत 1342.65 रुपये आहे. 12 जूनला शेअरची किंमत 1,384.55 रुपये होती. हा 52 आठवड्यांतील उच्चांक होता. महत्वाचे म्हणजे, टीव्हीएस मोटरचे मार्केट कॅप 63,000 कोटी रुपयांहूनही अधिक आहे.

टार्गेट प्राइस? - बाजारातील एक्सपर्ट शेअरसंदर्भात बुलिश दिसत आहेत. जीसीएल ब्रोकिंगचे वैभव कौशिक यांनी म्हटले आहे, हा शेअर 1515 रुपयांपर्यं जाऊ शकतो. शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार करता, प्रमोटर्सकडे 50.27% टक्के एवढी बहुमत हिस्सेदारी आहे. तर परदेशी गुंतवणूकदारांकडे, जवळपास 18.24% एवढी हिस्सेदारी आहे. या कंपनीचे एकूण 80 देशांत कामकाज चालते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक