Join us

Upcoming IPO: लवकरच येतीये कमाईची सुवर्ण संधी, फक्त एका दिवसात व्हाल मालामाल; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 9:22 PM

तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Upcoming IPO in 2023: तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळणार आहे. अनेक कंपन्या बाजारात IPO आणत आहेत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून चांगली कमाई करू शकता. आयटी क्षेत्रातील कंपनी राशी पेरिफेरल्स, इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा कंपनी SaitDLM, आरोग्य सुविधा कंपनी HealthVista India आणि वित्तीय तंत्रज्ञान (fintech) कंपनी Zagal Prepaid Ocean Services यांना IPO द्वारे पैसे उभारण्यासाठी SEBI चा हिरवा सिग्नल मिळाला आहे.

कंपन्यांनी कागदपत्रे सादर केली होतीसेबीने बुधवारी सांगितले की, चार कंपन्यांनी जुलै 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान IPO कागदपत्रे रेग्युलेटरला सादर केली होती. कंपन्यांना 29-31 मार्च दरम्यान बाजार नियामकाची परवानगी मिळाली आहे. कोणत्याही कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते.

किती कोटींचा IPO येणारकागदपत्रांनुसार, राशी पेरिफेरल्सच्या IPO मध्ये 750 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. यामध्ये कोणत्याही ऑफर फॉर सेलचा (OFS) याशिवाय सेंट डीएलएमच्या आयपीओमध्ये 740 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. यामध्येही कोणत्याही ऑफर फॉर सेलचा (OFS) समावेश नाही.

Healthvista 200 कोटींचा IPO आणणार याशिवाय, हेल्थविस्टा इंडियाच्या IPO मध्ये 200 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. त्याचे भागधारक 56,252,644 शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर आणतील.

IPO BSE-NSE वर सूचिबद्ध होईलजगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेसच्या IPO मध्ये 490 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांकडून 1.05 कोटी शेअर्सची विक्रीची ऑफर आणली जाईल. या कंपन्यांचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारशेअर बाजार