Join us  

कमाईची सुवर्ण संधी! 2024 मध्ये Ola-Swiggy सह 'या' कंपन्यांचे IPO येणार, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 6:48 PM

Upcoming IPO In 2024 : 2024 मध्ये IPO च्या माध्यमातून सुमारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी आहे.

Upcoming IPO In 2024 : हे वर्ष शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चढ-उताराचं राहिलं. वर्षभरात प्रायमरी मार्केटमध्ये अनेक IPO आले, तर टाटा टेकपासून अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांचे इश्यू लॉन्च करुन गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. आता येणाऱ्या वर्षासाठी शेअर बाजार तयारीला लागला असून यंदाही IPO मार्केटमध्ये धमाका होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी आयपीओ आणण्यासाठी SEBI कडे कागदपत्रे सादर केली आहेत. 2024 मध्ये IPO च्या माध्यमातून सुमारे 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी आहे.

आतापर्यंत 57 IPO लॉन्च केले रिपोर्टनुसार, 2023 मध्ये एकूण 57 कंपन्यांनी त्यांचे IPO लॉन्च केले असून, त्याद्वारे बाजारातून 49,000 रुपये उभे केले आहेत. या वर्षी सुमारे 80 कंपन्यांनी त्यांच्या IPO बाबत बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे किंवा DRHP दाखल केले होते. यापैकी बरेच लॉन्च केले गेले आहेत, तर 27 कंपन्यांना बाजार नियामक सेबी कडून इश्यू लॉन्च करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे, त्यांचे एकूण मूल्य सुमारे 29,000 कोटी रुपये आहे.

नवीन वर्षात या IPO वर लक्ष ठेवाअनेक मोठ्या आणि छोट्या कंपन्या नवीन वर्षात त्यांचे IPO लॉन्च करण्यासाठी सज्ज आहेत. सर्वात मोठ्या नावांमध्ये, ओला इलेक्ट्रिक पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी देखील त्यांचा आयपीओ लॉन्च करू शकते. नवीन वर्षात IPO लॉन्च करण्याच्या तयारीत असलेल्या कंपन्यांच्या यादीत कपड्यांची मोठी कंपनी FirstCry चे नाव देखील आहे. 

या कंपन्याही रांगेत उभ्या Ola, Swiggy आणि FirstCry व्यतिरिक्त, अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ लॉन्च करण्याची तयारी केली आहे. यामध्ये Ebixcash, Tata Play, Indegene, Oravel Stays (OYO), Go Digit General Insurance आणि TBO Tek सारख्या कंपन्यांची नावे सामील आहेत. एकंदरीत, 2023 प्रमाणे 2024 मध्ये आयपीओ चर्चेत असेल आणि गुंतवणूकदारांनाही कमाईच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

(नोट- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक