Lokmat Money >शेअर बाजार > Upcoming IPO: पैसे तयार ठेवा, बाजारात एक नाही तर येतायेत ११ नवीन IPO; 'या' मोठ्या नावांचा समावेश

Upcoming IPO: पैसे तयार ठेवा, बाजारात एक नाही तर येतायेत ११ नवीन IPO; 'या' मोठ्या नावांचा समावेश

IPOs This Week: यावर्षी शेअर बाजारात विक्रमी संख्येने कंपन्या आयपीओ आणत आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात नवीन ११ आयपीओची भर पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:07 AM2024-09-22T10:07:24+5:302024-09-22T10:08:38+5:30

IPOs This Week: यावर्षी शेअर बाजारात विक्रमी संख्येने कंपन्या आयपीओ आणत आहेत. सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात नवीन ११ आयपीओची भर पडणार आहे.

upcoming ipos manba finance krn heat exchanger among 11 companies to launch issue this week | Upcoming IPO: पैसे तयार ठेवा, बाजारात एक नाही तर येतायेत ११ नवीन IPO; 'या' मोठ्या नावांचा समावेश

Upcoming IPO: पैसे तयार ठेवा, बाजारात एक नाही तर येतायेत ११ नवीन IPO; 'या' मोठ्या नावांचा समावेश

IPOs This Week: गेल्या आठव्यात बजाज फायनन्सचा आयपीओ घेण्याची संधी हुकली असेल तर काळजी करू नका. कारण, पुढील आठड्यात शेअर बाजारात कमाईची चांगली संधी चालून आली आहे. पुढील 5 दिवसांत, देशांतर्गत शेअर बाजारात तब्बल 11 नवीन IPO लॉन्च केले जात आहेत. ज्यात मेनबोर्ड आणि SME या दोन्ही श्रेणींचे IPO समाविष्ट आहेत. बजाज फायनन्यचा आयपीओ घेणाऱ्या गुंतवणूकदारांची गेल्या आठव्यात चांदी झाली. बजाज आयपीओने जवळपास १३४ टक्केपेक्षा जास्तीचे रिटर्न अवघ्या २ दिवसात दिले. 

मेनबोर्डवर लाँच हे २ हे 2 IPO
IPO कॅलेंडरनुसार, आठवडाभरात लाँच होणाऱ्या IPO मध्ये Manaba Finance आणि KRN Heat Exchanger ही २ प्रमुख नावे आहेत. मेनबोर्डवर लाँच होणाऱ्या या 2 IPO च्या माध्यमातून या दोन्ही कंपन्यांचे सुमारे ४८२ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य आहे. Manaba Finance चा १५०.८४ कोटी रुपयांचा आयपीओ 23 सप्टेंबरला उघडणार असून २५ सप्टेंबरला बंद होणार आहे. त्याची इश्यू किंमत ११४ ते १२० रुपये आहे, तर एका लॉटमध्ये १२५ शेअर्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, KRN हीट एक्सचेंजरचा ३४१.९५ कोटी रुपयांचा IPO 25 सप्टेंबर रोजी उघडणार असून 27 सप्टेंबर रोजी बंद होईल. या आयपीओच्या एका लॉटमध्ये ६५ शेअर्सचा समावेश असेल. त्याची इश्यू किंमत २०९ ते २२० रुपये आहे.

SME सेगमेंट ९ आयपीओ
आठवडाभरात SME सेगमेंटमध्ये एकूण 9 आयपीओ उघडत आहेत. सर्वप्रथम, ३०.४१ कोटी रुपयांचा रॅपिड व्हॉल्व्स आयपीओ तर २५.५६ कोटी रुपयांचा व्हॉल ३डी इंडिया आयपीओ हे २ आयपीओ २३ सप्टेंबर रोजी उघडणार आहेत. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी थिंकिंग हॅट्स एंटरटेनमेंट सोल्युशन्सचा १५.०९ कोटी रुपयांचा आयपीओ लाँच होईल. तर त्याच दिवशी युनिलेक्स कलर्स आणि केमिकल्सचा ३१.३२ कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. २६ सप्टेंबरला फोर्ज ऑटोचा आयपीओ (३१.१० कोटी), सहस्र इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स आयपीओ (१८६.१६ कोटी) आणि दिव्यधन रिसायकलिंग इंडस्ट्रीज आयपीओ (२४.१७ कोटी) बाजारात येतील. तर 27 सप्टेंबरला साझ हॉटेल्सचा २७.६३ कोटी रुपयांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उघडेल.

शेअर्सची लांबलचक लिस्ट
या आठवडाभरात बाजारात लिस्टेड होणाऱ्या शेअर्सची मोठी रांगच लागणार आहे. आठवडाभरात लिस्टेड होणाऱ्या शेअर्समध्ये मेनबोर्डवरील वेस्टर्न करिअर्स, आर्केड डेव्हलपर्स आणि नॉर्दर्न आर्क कॅपिटल यांचा समावेश आहे. एसएमई सेगमेंटमध्ये पॉप्युलर फाउंडेशन, डेक्कन ट्रान्सकॉन लीजिंग, एन्व्हिरटेक सिस्टम्स, पेलेट्रो लिमिटेड, ओसेल डिव्हाइसेस, पॅरामाउंट स्पेशालिटी फोर्जिंग्स, कलाना इस्पात, अवी अंश टेक्सटाईल, फिनिक्स ओव्हरसीज, एसडी रिटेल आणि बाइकवो ग्रीनटेक यांची नावे समाविष्ट आहेत.

(Disclaimer- यामध्ये शेअर्स आणि आयपीओबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: upcoming ipos manba finance krn heat exchanger among 11 companies to launch issue this week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.