Lokmat Money >शेअर बाजार > IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती...

IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती...

Upcoming IPOs: तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 21:33 IST2024-12-13T21:32:26+5:302024-12-13T21:33:14+5:30

Upcoming IPOs: तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Upcoming IPOs: Opportunity to earn in the IPO market; IPO of 'these' 2 companies will be held on December 19, know the complete details... | IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती...

IPO मार्केटमध्ये कमाईची संधी; 19 डिसेंबरला येणार 'या' 2 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या माहिती...

Upcoming IPOs: तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 19 डिसेंबर रोजी 2 नवीन IPO बाजारात सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहेत. यामध्ये पॅकेजिंग मशिनरी उत्पादक ममता मशिनरी लिमिटेडचा 179 कोटी रुपयांचा IPO 19 डिसेंबर रोजी उघडणार आहे, तर ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडचा IPO 19 डिसेंबर रोजी उघडणार आहे. या दोन्ही IPO साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण तपशील जाणून घ्या.

ममता मशिनरी IPO
पॅकेजिंग मशिनरी उत्पादक ममता मशिनरी लिमिटेडचा 179 कोटी रुपयांचा IPO 19 डिसेंबर रोजी उघडेल. कंपनीने यासाठी 230-243 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. कंपनीने सांगितले की, इश्यू 23 डिसेंबर रोजी बंद होईल. अँकर (मोठे) गुंतवणूकदार 18 डिसेंबरला एक दिवस आधी बोली लावू शकतील.

IPO पूर्णपणे OFS आहे
गुजरात-आधारित कंपनीची प्रारंभिक शेअर विक्री ही प्रवर्तकांकडून 73.82 लाख इक्विटी शेअर्सची संपूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) आहे. OFS अंतर्गत शेअर्स विकणाऱ्यांमध्ये महेंद्र पटेल, नयना पटेल, भगवती पटेल, ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिसेस LLP आणि ममता मॅनेजमेंट सर्व्हिसेस LLP यांचा समावेश आहे. हे OFS असल्याने, कंपनीला सार्वजनिक इश्यूमधून कोणतीही रक्कम मिळणार नाही. 

ट्रान्सरेल लाइटिंग IPO
ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड 19 डिसेंबर रोजी आपला IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी IPO अंतर्गत 400 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करणार आहे. प्रवर्तक अजन्मा होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडद्वारे 1.01 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) देखील आणली जाईल. IPO कागदपत्रांनुसार, अजन्मा होल्डिंग्सची मुंबईस्थित कंपनीमध्ये 83.22 टक्के हिस्सेदारी आहे.

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड काय करते?
ट्रान्सरेल लाइटिंग ही भारतातील प्रमुख अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) कंपन्यांपैकी एक आहे. हे प्रामुख्याने वीज पारेषण आणि वितरण व्यवसाय क्षेत्रात आहे. कंपनीचा व्यवसाय 58 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Upcoming IPOs: Opportunity to earn in the IPO market; IPO of 'these' 2 companies will be held on December 19, know the complete details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.