Lokmat Money >शेअर बाजार > Lotus Chocolate Share Price : रिलायन्सच्या 'या' शेअरमध्ये २७ दिवसांपासून अपर सर्किट; आता प्रॉफिट बुकिंग आणि लोअर सर्किट, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Lotus Chocolate Share Price : रिलायन्सच्या 'या' शेअरमध्ये २७ दिवसांपासून अपर सर्किट; आता प्रॉफिट बुकिंग आणि लोअर सर्किट, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Lotus Chocolate Share Price : रिलायन्स समूहाच्या मालकीचा या कंपनीचा शेअर सोमवारी पाच टक्क्यांनी घसरून २,३६०.२५ रुपयांवर आला. या शेअरनं सलग २७ दिवस अपर सर्किटला धडक दिली असून अवघ्या एका महिन्यात १४६ टक्के परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:03 PM2024-08-26T13:03:50+5:302024-08-26T13:04:05+5:30

Lotus Chocolate Share Price : रिलायन्स समूहाच्या मालकीचा या कंपनीचा शेअर सोमवारी पाच टक्क्यांनी घसरून २,३६०.२५ रुपयांवर आला. या शेअरनं सलग २७ दिवस अपर सर्किटला धडक दिली असून अवघ्या एका महिन्यात १४६ टक्के परतावा दिला आहे.

Upper Circuit in Reliance s lotus chocolate Share for 27 Days Now with profit booking and the lower circuit what should investors do | Lotus Chocolate Share Price : रिलायन्सच्या 'या' शेअरमध्ये २७ दिवसांपासून अपर सर्किट; आता प्रॉफिट बुकिंग आणि लोअर सर्किट, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Lotus Chocolate Share Price : रिलायन्सच्या 'या' शेअरमध्ये २७ दिवसांपासून अपर सर्किट; आता प्रॉफिट बुकिंग आणि लोअर सर्किट, गुंतवणूकदारांनी काय करावं?

Lotus Chocolate Share Price : शेअर बाजार पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं ट्रेडिंग दरम्यान २५००० ची पातळी ओलांडली. विशेष बाब म्हणजे निफ्टीमधील ही पातळी गॅप अप ओपनिंगमधून आलेली नाही तर २४९०६ च्या पातळीवर उघडून ट्रेडिंग करून ही पातळी गाठली. यादरम्यान, रिलायन्स समूहाच्या मालकीचा लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा शेअर सोमवारी पाच टक्क्यांनी घसरून २,३६०.२५ रुपयांवर आला. या शेअरनं सलग २७ दिवस अपर सर्किटला धडक दिली असून अवघ्या एका महिन्यात १४६ टक्के परतावा दिला आहे.

गेल्या २७ दिवसांपासून लोटस चॉकलेटच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली आणि यामुळे शेअरला अपर सर्किट लागलं होतं. परंतु सोमवारी त्यात ५ टक्क्यांची घसरण झाली आणि लोअर सर्किट लागलं. यामुळे शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

हा शेअर सातत्यानं वाढत असताना त्यात एकही सेलर नव्हता. परंतु सोमवारी यात प्रॉफिट बुकिंग होत असल्याचे संकेत मिळू लागलं. पेट्रल रिसर्चचे संस्थापक कलीम खान यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार शेअर बाजारात अनेकदा असं दिसून येतं की हाईप्ड शेअर्समध्ये वारंवार अपर सर्किट लागतं आणि मग जेव्हा या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग येतं तेव्हा सततच्या लोअर सर्किटमुळे गुंतवणूकदारांना त्यातून बाहेर पडणं कठीण होतं.

५ टक्क्यांचं सर्किट लिमिट

या शेअरमध्ये ५ टक्क्यांचं सर्किट लिमिट आहे आणि त्यानंतर व्यवहार होऊ शकत नाही, असं लोटस चॉकलेट कंपनीबाबत कलीम.  सोमवारच्या सत्रात ७६,२२७ शेअर्सचे व्यवहार झाले आणि त्यानंतर शेअरला लोअर सर्किट लागलं. या शेअरमध्ये पूर्वी बरीच तेजी दिसून आली आहे. अशा वेळी गुंतवणूकदारांनी आपला नफा सुरक्षित करण्यावर भर दिला पाहिजे.

२०२३ मध्ये अधिग्रहण

लोटस चॉकलेटचं रिलायन्स समूहानं मे २०२३ मध्ये अधिग्रहण केलं होतं. यानंतर या शेअरचा भाव १७६ रुपयांवरून २,६०८.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. म्हणजेच रिलायन्स समूहाचा भाग बनल्यानंतर या शेअरने १३८१ टक्के परतावा दिला आहे आणि तोही गुंतवणूकदारांना अवघ्या १५ महिन्यांत इतका बंपर परतावा मिळत आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Upper Circuit in Reliance s lotus chocolate Share for 27 Days Now with profit booking and the lower circuit what should investors do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.