Join us

Tesla साठी बॅटरी बनवणार ही कंपनी, बातमी येताच शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 4:31 PM

7 जून रोजी उर्जा ग्लोबल लिमिटेडने टेस्ला पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत एक करार केला आहे.

बॅटरी तयार करणारी कंपनी उर्जा ग्लोबल लिमिटेडच्या (Urja Global Limited) शेअर्सना आज 20 टक्क्यांचे अप्पर सर्किटलागले आहे. यानंतर कंपनीच्या एका शेअरची किंमत 10.60 रुपयांवर पोहोचली आहे. एका करारानंतर कंपनीच्या शेअर्समद्ये ही वाढ झाली आहे. 7 जून रोजी उर्जा ग्लोबल लिमिटेडने टेस्ला पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत एक करार केला आहे.

ऊर्जा ग्लोबल लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसर, टेस्ला पॉवर यूएसए ब्रँडअंतर्गत कंपनीला बॅटरीचे उत्पादन आणि सप्लाय करयाचा आहे. याच एका वृत्तामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  यानंतर अचानकपणे शेअर्सची मागणी वाढली आहे. आज, 25,57,861 शेअर्सची खरेदी झाली आहे. तसेच विक्रीचे सेक्शन खाली आहे. 

अशी आहे कंपनीची कामगिरी -गेल्या 1 वर्षापूर्वी उर्जा ग्लोबलच्या शेअरची किंमत 13.25 रुपये एवढी होती. जी आता 10.60 रुपयांवर आली आहे. अर्थात वर्षभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते आणि ठेवले होते ते अजूनही 20 टक्के तोट्यात आहेत. मात्र, कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांसाठी, गेल्या एका महिन्यात शेअरची किंमत 35 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, गेल्या एका महिन्यात शेअर्सच्या किंमतीत 35 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक