US Stock Market Crash: ट्रम्प यांच्या शुल्काचा परिणाम अमेरिकेच्याच शेअर बाजारावर जास्त दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजाराचाच बाजार उठला. ट्रम्प टॅरिफनंतर, गुरुवारी एस अँड पी ५०० मध्ये २०२० नंतरची सर्वात मोठी एक दिवसाची घसरण नोंदवली गेली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज ४ टक्क्यांनी घसरून ४०,५४५.९३ वर बंद झाला. त्यात १६०० अंकांची घसरण झाली. ट्रम्प यांच्या या शुल्कामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून यामुळे मंदी, महागाई आणि नफा कमी होऊ शकतो, असं बाजाराला वाटतं.
एस अँड पी ५०० साठी हा जून २०२० नंतरचा सर्वात वाईट दिवस होता. निर्देशांक ४.८ टक्क्यांनी घसरून ५,३९६.५२ वर बंद झाला. नॅसडॅक कंपोझिट ६.० टक्क्यांनी घसरून १६,५५०.६० वर बंद झाला. मार्च २०२० नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. १६ मार्च २०२० रोजी एस अँड पी १२ टक्क्यांनी घसरला.\
घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले
"जितका अंदाज होता, त्यापेक्षा हे दर अधिक आहेत. याचा परिणाम फक्त अर्थव्यवस्थेवरच नाही, तर कंपन्यांच्या नफ्यावरही पडेल," अशी प्रतिक्रिया व्हेंचुरा वेल्थ मॅनेजमेंटच्या टॉम काहिल यांनी दिली. तर दुसरीकडे ५० पार्क इन्व्हेंटमेंट्सच्या अॅडम सरहान यांनी, "टॅरिफमुळे कॉर्पोरेट नफ्टात घसरण होईल," असं म्हटलं. "अनिश्चितता इतकी जास्त आहे की बाजार मंदीच्या दिशेनं जात आहे. टप्प्यावर अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
२ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान
एस अँड पी डाऊ जोन्स इंडेक्सचे हॉवर्ड सिल्व्हरब्लाट यांच्या मते, एस अँड पी ५०० मध्ये ४.८% घसरण झाल्यानं मार्केट कॅपला २ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त फटका बसला. "अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा बदल आहे. अनेक देश मंदीच्या गर्तेत जाऊ शकतात," अशी प्रतिक्रिया फिच रेटिंग्सचे ओलू सोनोला यांनी दिली.