Join us  

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर ठरला वर्षातील दुसरा धमाकेदार लिस्टिंगवाला स्टॉक, ९२ टक्क्यांची उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 1:36 PM

21 जुलै रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरनं धमाकेदार एन्ट्री केली.

बनारसच्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 21 जुलै रोजी स्टॉक एक्स्चेंजमध्ये शेअरनं धमाकेदार एन्ट्री केली. शेअर बाजारासाठी शुक्रवारचा दिवस चांगला नव्हता. शेअर बाजारात मोठी घसरण दिसून झाली. असं असतानाही उत्कर्ष बँकेचा शेअर 92 टक्क्यांनी वधारला. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स जवळपास 900 टक्क्यांनी घसरला. 

अपेक्षेप्रमाणे, एनएसईवर शेअर 60 टक्क्यांनी वाढून 40 रुपयांवर उघडला. या स्मॉल फायनान्स बँकेनं आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 25 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स जारी केले होते. सुरुवातीला काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर शेअर 37.20 रुपयांपर्यंत खाली आला. पण, उत्तम व्हॅल्युएशन आणि गुंतवणूकदारांच्या प्रतिसादामुळे पुन्हा त्यात वाढ दिसून आली.

पहिल्याच दिवशी अपर सर्किटकामकाजादरम्यान सकाळच्या सत्रात या शेअरनं 48 रुपयांची पातळी गाठली होती. त्यानंतर, उर्वरित कामकाजादरम्यान, त्यात अपर सर्किट लागलं. 40 रुपयांच्या ओपनिंग प्राईसच्या या स्टॉकसाठी 20 टक्क्यांचं अपर सर्किट होतं. बीएसईवर शेअर 39.95 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूमही चांगला राहिला आहे. बीएसईवर 1.51 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली, तर एनएसईवर वर हा आकडा 26.54 कोटी इतका होता. 2023 मधील ही दुसरं सर्वोत्तम लिस्टिंग आहे. यापूर्वी आयडियाफोर्ज कंपनीचं लिस्टिंग जबरदस्त झालं होतं. कंपनीचे शेअर्स 7 जुलै रोजी लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी शेअर्समध्ये 92.8 टक्क्यांची उसळी दिसून आली होती.

व्यवसायाची उत्तम वाढउत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक तेजीनं वाढणाऱ्या बँकांपैकी एक आहे. याच्या ग्रॉस लोन पोर्टफोलियोची वाढ चांगली राहिली आहे. कंपनीनं या आयपीओद्वारे 500 कोटींचा निधी जमा केला आहे. कंपनीनं या शेअर्ससाठी 23-25 रुपयांचा प्राईज बँड निश्चित केला होता. बँकेनं आपल्या एकूण व्यवसायात मायक्रो बँकिंग बिझनेसची भागीदारी कमी केली आहे.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार