Join us  

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या IPO नं केलं मालामाल, ६० टक्के प्रीमिअमवर लिस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:36 PM

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओनं त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओनं (IPO) त्यांच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजमध्ये (Utkarsh Small Finance Bank Listing) लिस्ट झाले. बँकेचे शेअर्स बीएसईवर 59.80 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले आहेत. 14.95 रुपयांच्या वाढीसह शेअर 39.95 रुपयांवर लिस्ट झाला. लिस्टिंग झाल्यानंतरही या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद दिला होता. हा IPO 111 पट सबस्क्राइब झाला. तज्ज्ञांना या आयपीओच्या मोठ्या धमाकेदार लिस्टिंगची अपेक्षा होती आणि हा आयपीओ 60 टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला. बँकेचा आयपीओ 12 ते 14 जुलै दरम्यान आला होता. त्याची किंमत 23-25 ​​रुपये/शेअर ठेवण्यात आली होती. यामध्ये लॉट साइज 600 शेअर्सची होती. दरम्यान, गुंतवणूकदारांना किमान 15,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. वाराणसी स्थित असलेली ही स्मॉल फायनान्स बँक 2016 मध्ये सुरू झाली.

लिस्टिंगनंतरही शेअरच्या किंमतीत वाढलिस्टिंग झाल्यानंतरही उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये बंपर खरेदी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसईवर हा शेअर 11.61 टक्क्यांनी किंवा 4.64 रुपयांनी वाढून 44.59 रुपयांवर व्यवहार करत होता. अशा प्रकारे, या IPO च्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत सुमारे 78 टक्के परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर, शेअर सुरुवातीच्या व्यवहारात 10.25 टक्क्यांनी किंवा 4.10 रुपयांनी 44.10 रुपयांवर व्यवहार करताना दिसला.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक